शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी :घरकुल सर्वेक्षणासाठी मिळाली मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 23:57 IST

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उर्वरित लाभार्थ्यांना या योजनेत प्रपत्र ड भरुन लाभ घेता येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उर्वरित लाभार्थ्यांना या योजनेत प्रपत्र ड भरुन लाभ घेता येणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांसाठी घरे या योजनेंतर्गत प्रधानमंत्री घरकुल आवास योजना कार्यान्वित केली. या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबाला हक्काचे घर मिळावे, यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र अनेक लाभार्थी पात्र असतानाही त्यांची नावे योजनेत समाविष्ट झाली नाहीत. त्यामुळे लाभार्थ्यांत शासनाविरुद्ध तीव्र संताप होता. त्यामुळे जिल्हा परिषदस्तरावर ग्रामीण भागामध्ये लाभार्थ्यांचे सर्व्हेक्षण करुन त्यांच्याकडून प्रपत्र ड भरुन घेण्याची मोहीम राबविण्यात आली. १ ते ३० सप्टेंबर या काळात प्रत्येक पंचायत समितीअंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांची माहिती घेऊन त्यांच्याकडून प्रपत्र ड भरुन घेण्याचे काम करण्यात आले. प्रपत्र ड आॅनलाईन अपलोड करण्यासाठी ग्रामपंचायतस्तरावरील संगणक आॅपरेटर व कंत्राटी तत्वावर संगणक चालक नियुक्त करण्यात आले आहेत.लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करुन प्रपत्र ड भरुन घेण्यासाठी ३० सप्टेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली होती. या काळात जिल्ह्यात युद्धपातळीवर लाभार्थ्यांची माहिती गोळा केली; परंतु, जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित राहिले होते. त्यामुळे या लाभार्थ्यांचेही प्रपत्र ड भरुन घेण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी लाभार्थ्यांकडून करण्यात येत होती. त्यानुसार राज्य शासनाने या योजनेंतर्गत ३० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केंद्र शासनाकडे केली होती. त्यानंतर केंद्र शासनाने चार दिवसांचा अवधी घेत ४ आॅक्टोबरपासून ३० नोव्हेंबरपर्यंत या योजनेला मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या कालावधीत उर्वरित लाभार्थ्यांचे प्रपत्र ड भरुन घेण्याचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.योजनेच्या नावाखाली लूटप्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलापासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांचे प्रपत्र ड भरुन घेण्यासाठी ग्रामीण भागात गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचे आॅपरेटर व कंत्राटी संगणक चालक काम करीत आहेत. यासाठी शासनाच्या वतीने प्रति लाभार्थी जवळपास २० रुपयांचे मानधनही देण्यात येत आहे; परंतु, जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये १०० ते ५०० रुपये उखळले जात आहे. त्यामुळे या योजनेच्या नावाखाली लाभार्थ्याची मोठी लूट केली जात आहे. याकडे जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन होणारी लाभार्थ्यांनी लूट थांबवावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीHomeघरprime ministerपंतप्रधान