शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : वाळू उपसा करणारी गाढवं पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 23:43 IST

शहराजवळून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रातून विना परवाना अवैधरीत्या वाळू उपसा करताना १४ जानेवारी रोजी रात्री ११.३० वाजता महसूल प्रशासनाने ७ गाढवं पकडली. यावेळी गाढवांसोबत असलेले मालक मात्र अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): शहराजवळून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रातून विना परवाना अवैधरीत्या वाळू उपसा करताना १४ जानेवारी रोजी रात्री ११.३० वाजता महसूल प्रशासनाने ७ गाढवं पकडली. यावेळी गाढवांसोबत असलेले मालक मात्र अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले.गेल्या महिन्यात १० डिसेंबर रोजीच्या मध्यरात्री तहसीलदार स्वरुप कंकाळ यांच्या पथकाने गोदावरी नदीपात्रातून विना परवाना अवैधरीत्या वाळू उपसा करणारी २६ गाढवं पकडून त्यांचा लिलाव केला होता. यातून गाढवांच्या माध्यमातून होणारी वाळूचोरी काही प्रमाणात थांबली होती. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर १४ जानेवारी रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास गोदावरी नदीपात्रातून गाढवांद्वारे वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाल्याने मंडळ अधिकारी शंकर राठोड, तलाठी चंद्रकांत साळवे, शिवाजी मुरकुटे, गजानन शिंदे यांच्या पथकाने गोदावरी नदीपात्रातून वाळू चोरी करणारी ७ गाढवं ताब्यात घेतली. यावेळी गाढवांसोबत असलेले मालक मात्र अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. वाळू उपसा करताना पकडलेल्या सात गाढवांना धारखेड ग्रामपंचायत कार्यालयाचे सेवक मुंजाजी चोरघडे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. विशेष म्हणजे यापूर्वीप्रमाणेच गाढव मालक समोर आले नाहीत. त्यामुळे या गाढवांचाही लिलाव करण्याची वेळ महसूल प्रशासनावर येणार असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळूtheftचोरी