शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

परभणी : डॉक्टर, व्यापाऱ्यांनी सर केला कांचनगंगा शिखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 00:02 IST

जगातील तिसºया क्रमांकाचे उंच शिखर म्हणून ख्याती असलेल्या कांचनगंगा हे शिखर सर करण्याची कामगिरी परभणीतील डॉक्टर्स आणि व्यापारी असलेल्या गिर्यारोहकांनी फत्ते केली असून, या गिर्यारोहकांचे परभणी आगमन झाल्यानंतर जोरदार स्वागत करण्यात आले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जगातील तिसºया क्रमांकाचे उंच शिखर म्हणून ख्याती असलेल्या कांचनगंगा हे शिखर सर करण्याची कामगिरी परभणीतीलडॉक्टर्स आणि व्यापारी असलेल्या गिर्यारोहकांनी फत्ते केली असून, या गिर्यारोहकांचे परभणी आगमन झाल्यानंतर जोरदार स्वागत करण्यात आले़भारत नेपाळ सिमेवर वसलेल्या कांचनगंगा पर्वतात १७ हजार ८०० फुट उंचीवर बेसकॅम्प आहे़ ही मोहीम सर करण्यााठी जून महिन्यामध्ये तयारी करण्यात आली़ त्यानुसार परभणीतील डॉक्टर्स आणि व्यापारी गिर्यारोहकांनी सराव सुरू केला़ दररोज धावणे, कमी तापमानामध्ये शरिराची प्रतिकारक क्षमता वाढविणे असा सराव केल्यानंतर प्रत्यक्ष मोहिमेला प्रारंभ झाला़ १० दिवसांची ही मोहीम सिक्कीम राज्यातील युकसुम या गावापासून सुरू झाली़ इंडियन मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ़ राजू सुरवसे यांच्यासह अनेक पदाधिकारी, व्यापारी मोहिमेत सहभागी झाले होते़ ही मोहीम यशस्वी करून परतल्यानंतर डॉ़ राजू सुरवसे यांनी मोहिमेतील अनुभव कथन केले़ ते म्हणाले, परभणी शहरातील २१ डॉक्टर्स आणि १८ व्यापारी मोहिमेत सहभागी झाले होते़ जगातील दहा कठीण ट्रेक पैकी हा एक ट्रेक असल्याने आमच्यासमोर मोठे आव्हान होते़ ११ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मोहिमेला प्रारंभ झाला़ आमच्यासह १९ जण, ६ याक, ७ घोडे असा ६० जणांचा ताफा कांचनगंगा सर करण्यासाठी निघाला़ पहाटे ५ वाजेच्या सुमारास गडद अंधार असताना मोहिमेला सुरुवात केली़ साचेन, शौका, झोन्ग्री, थांगसिंग, लाम्होनी अशी मुक्कामाची ठिकाणे होती़ झोन्ग्रीपासूनच बर्फ पडण्यास सुरुवात झाली़ साधारणत: १० ते १५ किमी दररोज प्रवास करण्यात आला़ थंडी वाढत असल्याने त्याचे परिणाम शरिरावर होत होते़ सोबत डॉक्टर मंडळी असल्याने इतरांना दिलासा मिळाला असला तरी ही मोहीम फत्ते करताना अंगावर रोमांच उभे राहिले़ साधारणत: ६०० मीटर उंचीवरून कांचनगंगा पर्वतरांगांचे दर्शन झाले़ उणे ८ ते ९ डिग्री अशा वातावरणात प्रवासाला सुरुवात केली़ चारही बाजुंनी पांढराशुभ्र बर्फ आणि त्यावर पडलेले सोनेरी सूर्यकिरणे डोळ्यांची पारणे फेडत होती़ झोन्ग्री ते थांगसिंग हा १४ किमीचा प्रवास अत्यंत कठीण होता़ झाडांचे काटेरी खुराटे, आॅक्सीजनची कमतरता अशा परिस्थितीत ही मोहीम सर करण्यात आली़थांगसिंग येथे मुक्काम करण्यात आला़ लाम्होनी येथे शेवटचा मुक्काम झाला़ या ठिकाणी थंडी उणे १५ डिग्रीपर्यंत होती़ जोराचा वाराही वाहत होता़ येथून पुढे १३०० मीटर उंचीपर्यंत जायचे होते़ सकाळी ३ वाजताच या कठीण प्रवासाला सुरुवात करून कांचनगंगा हा शिखर सर करण्यात आम्हाला यश आले़ हा आनंद अत्यंत रोमांचकारी होता, असे डॉ़ सुरवसे यांनी सांगितले़ १९ नोव्हेंबर रोजी मोहीम यशस्वी झाली़ ही मोहीम यशस्वी करून परभणीत पोहचल्यानंतर परभणीतील नागरिकांनी गिर्यारोहकांचे जोरदार स्वागत केले़या मोहिमेत परभणी येथील डॉ़ राजू सुरवसे, विशाल वट्टमवार, अमोल मेटे, अनिल नव्हाट, अनिल पटवे, भारत देवसरकऱ, बी़ चंद्रशेखर, दीपक चव्हाण, दीपक मोरे, दीपक तळेकर, दिनेश बोबडे, ज्ञानराज खटींग, गजानन मार्डीकर, गजानन सराफ, गणेश निरस, हर्षद कत्रुवार, कैलास तिथे, डॉक़ेदार खटींग, लक्ष्मीकांत रापते, मयूर साळापुरीकर, ओम तलरेजा, पंढरीनाथ भंड, प्रभाकर टेकाळे, प्रमोद शिंदे, राजेश यादव, रामप्रसाद पवार, रविशंकर नव्हाट, सचिन देशमुख, सचिन माळवदकर, सचिन शिंदे, सागर मोरे, सनद जैन, संदीप मोरे, संतोष पालवे, शेखर इंगळे, शिवराज टेंगसे, तातेराव कदम, उत्तम वानखेडे, विकास वराळ, विलास वराळ, विठ्ठल शिसोदिया आदींनी सहभाग नोंदविला़

टॅग्स :parabhaniपरभणीdocterडॉक्टर