शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

पुरेसा चलन पुरवठा नसल्याने परभणी जिल्ह्याची आर्थिक नाडी मंदावली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 6:09 PM

जिल्हा मध्यवर्ती बँकेला पुरेसा चलन पुरवठा होत नसल्याने जिल्हाभरातील आर्थिक व्यवहार कोलमडले आहेत़

परभणी : येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेला पुरेसा चलन पुरवठा होत नसल्याने जिल्हाभरातील आर्थिक व्यवहार कोलमडले आहेत़ या बँकेला दररोज ५ कोटी रुपयांचे चलन आवश्यक असताना प्रत्यक्षात ५० लाख रुपयांचाच  पुरवठा होत असल्याने आर्थिक व्यवहार करताना बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत  आहे़ दुसरीकडे इतर बँकांमध्येही चलन तुटवड्याची समस्या गंभीर झाली आहे़ पुरेसे चलन नसल्याने जिल्ह्यातील आर्थिक व्यवहार कोलमडले आहेत़ 

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही ग्रामीण भागाची आर्थिक नाडी म्हणून काम पाहते़ परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्यात बँकेच्या १६० शाखा आहेत़ या शाखांमधून शेतकरी, कष्टकऱ्यांपर्यंत निधी पुरविण्याचे महत्त्वाचे काम जिल्हा बँकेमार्फत होते़ मात्र मागील काही महिन्यांपासून या बँकेला चलन तुटवड्याच्या समस्येने ग्रासले आहे़ जिल्हा बँकेमध्ये सर्वसाधारणपणे शेतकरी व कर्मचाऱ्यांचे खाते आहेत़ अनेक कर्मचाऱ्यांचे वेतन जिल्हा बँकेतून दिले जाते़ बँकेला दररोज ५ कोटी रुपयांची आवश्यकता असते़ मात्र परभणी जिल्ह्यातील करन्सी बँक असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडियामधून पुरेसा चलन पुरवठा होत नाही़ त्यामुळे बँकेचे आर्थिक व्यवहार कोलमडले आहेत़ जिल्हा बँकेतून अल्प, अत्यल्प उत्पन्न गटातील लोकांना तसेच शासकीय सेवा सुविधा प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले जाते़ सध्या पीक विमा व निराधारांचे वेतन देण्याचे काम सुरू आहे़ परंतु, चलन तुटवडा भासत असल्याने ही कामे खोळंबली आहेत़ 

 एटीएम बनले कॅशलेसपरभणी शहरात राष्ट्रीयकृत, खाजगी व सहकारी बँकांची ५० हून अधिक एटीएम केंद्रे आहेत़ शहराच्या विविध भागांत असलेल्या या एटीएममधून ग्राहकांना रोख रक्कम हाती मिळते़ दोन दिवसांपासून या एटीएमचा व्यवहारही कोलमडला आहे़ बहुतांश एटीएम कॅशलेस झाल्याने ग्राहकांना धावपळ करावी लागत आहे़ दिवसभर उन्हामध्ये एटीएममध्ये रोकड आहे का, याचा शोध घेत ग्राहक फिरत आहेत़ त्यामुळे ग्राहकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असून, किमान शहरातील एटीएम केंदे्र तरी सुस्थितीत सुरू ठेवावेत़ पुरेशी रक्कम या  एटीएममध्ये टाकावी, अशी मागणी होत आहे़ 

आॅनलाईन व्यवहाराचा ग्राहकांना फटकाएकीकडे एटीएममध्ये बँकांकडून मुबलक प्रमाणात पैसे उपलब्ध करून दिले जात नसल्याने ग्राहकांनी आॅनलाईन व्यवहार करण्यास सुरुवात केली आहे़ परंतु, विविध बँकांकडून या आॅनलाईन व्यवहारापोटी काही रुपयांची रक्कम आकारली जात आहे़ त्यामुळे याचा ग्राहकांना फटका सहन करावा लागत आहे़ शिवाय जीएसटीच्या नावाखालीही ग्राहकांच्या खात्यामधून पैसे कपात केले जात असल्याने ग्राहकांमधून संताप व्यक्त केला जात आहे़ बँक स्टेटमेंट, बँकेचे दुसरे पासबुक देणे आदी कामांसाठी यापूर्वीपासून बँकांकडून शुल्क आकारले जात आहे़ 

निराधारांची वाढली गैरसोयसंजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, वृद्धापकाळ योजनेसह इतर योजनांच्या माध्यमातून शासनाचे अनुदान या बँकेमार्फत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचते केले जाते़ मात्र मागील काही दिवसांपासून पुरेसे चलन उपलब्ध नसल्याने गोरगरीब लाभार्थ्यांची परवड होत आहे़ या लाभार्थ्यांना त्यांचे वेतन पुरविताना बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे़ बँकेच्या उपव्यवस्थापकांनी या संदर्भात पत्र काढून ग्राहकांच्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे़ करन्सी बँकेकडून मुबलक चलन पुरवठा झाल्यानंतरच व्यवहार सुरळीत होतील, असेही कळविले आहे़ 

टॅग्स :bankबँकMONEYपैसाatmएटीएम