शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पुन्हा एकदा बदलणार; सहा महिन्यांसाठी बी आर गवई यांच्या नावाची शिफारस
2
"चंद्रकांत खैरे शिवसेनेचे शंकराचार्य...! कडवट शिवसैनिक कसे झालात?"; राऊतांच्या प्रश्नाला खैरेंनी दिलं असं उत्तर!
3
“गांधी कुटुंब कायद्यापेक्षा मोठे नाही, सगळ्या देशाला माहितीये की...”; विनोद तावडेंचा पलटवार
4
उदय सामंत आणि संदिपान भुमरे अचानक मनोज जरांगेंच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
5
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी कायम! बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव, ऑटोसह 'या' सेक्टरमध्ये घसरण
6
जयदीप अहलावतला होती रणबीरच्या 'रामायण'मधील 'या' भूमिकेची ऑफर, दिला नकार कारण...
7
बापरे! गळ्यात चप्पलांचा हार, रखरखत्या उन्हात अनवाणी...; विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची धडपड
8
शरद पवारांनी इतिहास लिहून हवी त्यांची माती करावी; गोपीचंद पडळकरांची टीका
9
"अमित शाह आमचे नेते, सांगायला लाज वाटत नाही"; राऊतांना प्रत्युत्तर देताना भडकले संजय शिरसाट
10
'देऊळ बंद २'ची झाली घोषणा; गश्मीर महाजनी म्हणाला, "मी त्यात नाहीए पण..."
11
कौतुकास्पद! देशातील पहिले डिजिटल शिक्षणाचे ऑनलाईन पोर्टल ‘महाज्ञानदीप’ महाराष्ट्रात सुरू
12
अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्धाचा भडका! ट्रम्प चीनवर लादणार २४५% कर, झटक्यात १००% वाढ
13
बॉबी देओलने खरेदी केली शानदार रेंज रोव्हर SUV, किंमत आहे कोटींच्या घरात, जाणून घ्या
14
“मी त्यांना जास्त महत्त्व देत नाही”; राज-एकनाथ शिंदे भेटीवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले
15
मम्मी... मम्मी...! नदीमध्ये रील बनवण्याची 'नशा' जिवावर बेतली, पाय घसरून महिला गंगेत बुडाली; Video Viral
16
“सोनिया गांधी-राहुल गांधींवरील ED कारवाई सुडबुद्धीने, काँग्रेस डगमगणार नाही”: चेन्नीथला
17
गुरुवारी लक्ष्मी नारायण त्रिकोण योग: ९ राशींना घवघवीत यश, भरघोस लाभ; ऐश्वर्य, वैभव प्राप्ती!
18
IPL 2025: बुमराह पाठोपाठ आणखी एक गोलंदाज फिटनेस टेस्टमध्ये पास; झाला संघात सामील
19
Sharvari Wagh : "गेल्या ५ वर्षात मी दररोज नापास होत होते..."; अभिनेत्री शर्वरी वाघने केला रिजेक्शनचा सामना
20
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार आदर्श पत्नी कोण? वाचा 'हा' श्लोक आणि जाणून घ्या लक्षणं!

परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे लाच घेताना रंगेहात एसीबीच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 19:15 IST

काही दिवसांपूर्वी क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांची पैशांची मागणी करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती

परभणी : जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी स्पर्धेचे देयक काढण्यासाठी अडीच लाख रुपयांची लाच मागितली. यामध्ये लाच घेताना त्यांना एसीबीच्या पथकाने गुरुवारी ताब्यात घेतले. 

मानवत येथील एका तक्रारदाराला तिथल्या क्रीडा स्पर्धेचे बिल तसेच स्विमिंग पूलची मान्यता देण्यासाठी कविता नावंदे यांनी अडीच लाखांची लाच मागितली होती. त्यातील एक लाख रुपये पहिल्यांदाच त्यांनी स्वीकारले होते. त्यानंतर उर्वरित रक्कमेची मागणी केल्याने तक्रारदाराने परभणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्या अनुषंगाने या तक्रारीची पडताळणी करण्यात आली आणि आज सापळा रचून दीड लाख रुपये स्वीकारताना कविता नावंदे यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. सध्या त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयामध्ये नेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ही सुरू आहे.

विधानसभेतही आमदारांनी मांडला होता प्रश्नकाही दिवसांपूर्वी क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांची पैशांची मागणी करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती तर एक दिवसापूर्वी आमदार राहुल पाटील, आमदार राजेश विटेकर यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करून त्यांच्या बडतर्फीची मागणी केली होती. हे प्रकरण ताजे असताना गुरुवारी दुपारी एसीबीच्या पथकाने केलेल्या कारवाईत जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे या लाच मागणी प्रकरणात अडकल्या. स्पर्धेचे देयक काढण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे अडीच लाखांची मागणी केली होती.

टॅग्स :parabhaniपरभणीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग