शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

परभरणीजिल्ह्यात उरला केवळ ०.७२ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 23:36 IST

आॅगस्टचा पहिला आठवडा संपला असला तरी जिल्ह्याला अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायमच आहे. जिल्ह्यात असलेल्या ९ प्रकल्पामध्ये आज घडीला केवळ ०.७६ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे. या साठ्याची टक्केवारीही केवळ ०.७२ इतकी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: आॅगस्टचा पहिला आठवडा संपला असला तरी जिल्ह्याला अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायमच आहे. जिल्ह्यात असलेल्या ९ प्रकल्पामध्ये आज घडीला केवळ ०.७६ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे. या साठ्याची टक्केवारीही केवळ ०.७२ इतकी आहे.जिल्ह्यात चार उच्चपातळी बंधारे असून या बंधाऱ्याची पूर्ण जलक्षमता ही १०१.९४ दलघमी इतकी आहे. आजघडीला या उच्च पातळी बंधाºयामध्ये शून्य टक्के जलसाठा आहे. तीन लघु प्रकल्पही जिल्ह्यात असून या लघुप्रकल्पांची क्षमता ४.८४ दलघमी इतकी आहे. प्रत्यक्षात हे तिन्हीही लघु प्रकल्प कोरडे आहेत. जिल्ह्यात असलेल्या दोन कोल्हापुरी बंधाऱ्यांमध्ये काही अंशी पाणी शिल्लक आहे. ०.७६ दलघमी जलसाठा या बंधाºयामध्ये असून पूर्ण जलक्षमता ही २.८० इतकी आहे.जिल्ह्यात असलेल्या ९ प्रकल्पांची साठवण क्षमता ही १०९.५८ दलघमी इतकी आहे. प्रत्यक्षात केवळ ०.७६ दलघमी जलसाठा या प्रकल्पामध्ये उरला आहे. एकूणच जिल्ह्यातील प्रकल्पामधील पाणी वाढण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा केली जात आहे. जिल्ह्यात असलेल्या गोदावरी, दुधना, करपरा, मासोळी, पूर्णा या प्रमुख नद्या अद्याप कोरड्याच आहेत. दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे पूर्णा नदी शनिवार पासून वाहती झाली आहे. येलदरी प्रकल्पातील जलसाठ्यातही काही अंशी पाणी वाढले आहे. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे पिकांची परिस्थिती चांगली आहे. पण त्याचवेळी जिल्ह्यातील प्रकल्प कोरडे असल्याने चिंता वाढली आहे. आगामी काळात मोठा पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न भेडसावणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरणWaterपाणी