शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्हा : कृषी स्वावलंबन योजनेसाठी १० कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 00:10 IST

डॉ़ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना २०१८-१९ साठी जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील शेतकऱ्यांना नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोअरिंग, वीज जोडणी आकार, पंप संच, सूक्ष्म सिंचन संच इ. कामांसाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे़ परभणी जिल्हा हा शेतीवर अवलंबून आहे़ अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकºयांकडे शेती उपलब्ध आहे; परंतु, या शेतीमध्ये आधुनिक बदल करून जास्तीचे उत्पादन घेण्यासाठी आवश्यक असणारे पाणी, वीज, सूक्ष्म सिंचनासाठी आवश्यक साहित्य त्यांच्याकडे नाही़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : डॉ़ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना २०१८-१९ साठी जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील शेतकऱ्यांना नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोअरिंग, वीज जोडणी आकार, पंप संच, सूक्ष्म सिंचन संच इ. कामांसाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे़परभणी जिल्हा हा शेतीवर अवलंबून आहे़ अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकºयांकडे शेती उपलब्ध आहे; परंतु, या शेतीमध्ये आधुनिक बदल करून जास्तीचे उत्पादन घेण्यासाठी आवश्यक असणारे पाणी, वीज, सूक्ष्म सिंचनासाठी आवश्यक साहित्य त्यांच्याकडे नाही़या घटकांतील शेतकरी शेती करूनही अपेक्षित प्रमाणे उत्पन्न घेऊ शकत नाहीत़ त्यामुळे राज्य शासनाने या सर्व बाबींचा विचार करून अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकºयांच्या उत्पादनात वाढ करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच या घटकातील शेतकºयांना स्वयंपूर्ण करण्यासाठी ५ जानेवारी २०१७ पासून विशेष घटक योजनेचे डॉ़ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेमध्ये रुपांतर करण्यात आले़ या योजनेंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न् असणाºया अनुसूचित जातींच्या शेतकºयांना नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोअरींग, वीज जोडणी आकार, पंप संच, शेततळ्यांचे प्लास्टिक अस्तरीकरण, सूक्ष्मसिंचन संच आदी कामांसाठी अनुदान देण्यात येते़ या योजनेंतर्गत नवीन विहीर घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे कमीत कमी ४० आर क्षेत्र असणे बंधनकारक आहे़ २०१८-१९ मध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकºयांसाठी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राज्यामध्ये राबविण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने २३६ कोटी ५९ लाख ६४ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे़ त्यामध्ये परभणी जिल्ह्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीfundsनिधी