शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्हा: वर्षभरात ४८३ बालकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:29 IST

जिल्हाभरात जून २०१७ ते मे २०१८ या वर्षभराच्या कालावधीत ४८३ उपजत, अर्भक व बालकांचा मृत्यू झाला आहे़ या मृत्यूमागे विविध कारणे असले तरी बालमृत्यूचे प्रमाण लक्षात घेता मृत्यूदर कमी करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनाला पार पाडावे लागणार आहे़

चंद्रमुनी बलखंडे।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हाभरात जून २०१७ ते मे २०१८ या वर्षभराच्या कालावधीत ४८३ उपजत, अर्भक व बालकांचा मृत्यू झाला आहे़ या मृत्यूमागे विविध कारणे असले तरी बालमृत्यूचे प्रमाण लक्षात घेता मृत्यूदर कमी करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनाला पार पाडावे लागणार आहे़राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने गरोदर माता, स्तनदामाता यासह बालकांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येतात़ मानव विकास मिशन अंतर्गत बुडीत मजुरीसह बालकांच्या पोषणासाठीही शासनस्तरावरून निधी उपलब्ध करून दिला जातो़ मृत्यूदर कमी करण्यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी, मृत्यूदर पाहिजे त्या प्रमाणात कमी होत नसल्याचे दिसून येत आहे़ परभणी जिल्ह्यात जून २०१७ ते मे २०१८ या कालावधीत ४८३ उपजत, अर्भक, बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडे झाली आहे़वर्षभरात २२ हजार ५४१ बालकांचा जन्म झाला़ जन्मदराचे प्रमाण १७़९६ टक्के आहे़ असे असले तरी मृत्यूचे प्रमाणही पाहिजे त्या तुलनेत कमी होत नाही़ जिल्हाभरात १८५ उपजत बालकांचा मृत्यू झाला़ यामध्ये गंगाखेड तालुक्यात ९, पाथरी १३, परभणी ४४, जिंतूर ३०, पालम १७, पूर्णा २१, सेलू ४० तर मानवत तालुक्यात ११ उपजत बालकांचा समावेश आहे़ उपजत मृत्यूचा दर ८़२१ आहे़ ० ते १ वर्ष वयोगटातील २३६ अर्भकांचा वर्षभरात मृत्यू झाला़ यामध्ये गंगाखेड तालुक्यात ९, पाथरी १६, परभणी ६७, जिंतूर ३५, पालम २१, पूर्णा ३१, सेलू ४०, सोनपेठ ३ तर मानवत तालुक्यात १४ अर्भकांचा समावेश आहे़अर्भक मृत्यूचा दर १०़४७ आहे़ यासोबत १ ते ५ वर्षे वयोगटातील ६२ बालकांचा मृत्यू झाला़ यामध्ये परभणी तालुक्यातील ५ बालकांचा समावेश आहे़ पाथरी तालुक्यातील ६, परभणी १०, जिंतूर १७, पालम २, पूर्णा १७ तर मानवत तालुक्यातील ५ बालमृत्यूचा समावेश आहे़ बालमृत्यूचा दर १३़२२ एवढा आहे़२२ हजार ५४१ बालकांचा जन्मजून २०१७ ते मे २०१८ या कालावधीत जिल्हाभरात २२ हजार ५४१ बालके जन्मली आहेत़ यामध्ये गंगाखेड तालुक्यात ३ हजार ५९ बालके जन्मली़ पाथरी तालुक्यात १ हजार ७७०, परभणी तालुक्यात ३ हजार ९१६, जिंतूर तालुक्यात ४ हजार १७१, पालम तालुक्यात २ हजार ४३, पूर्णा तालुक्यात २ हजार ६२८, सेलू १ हजार १०२, सोनपेठ १ हजार ४३९, मानवत १ हजार ४१३ असा २२ हजार ५४१ बालकांचा वर्षभरात जन्म झाला़एका गरोदर मातेचा समावेशशासनाच्या वतीने गरोदर मातांसाठी बुडीत मजुरी, पंतप्रधान मातृवंदना योजना राबविण्यात येतात़ या काळामध्ये मातांना आराम मिळावा, हा उद्देश आहे़ विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्या तरी परभणी तालुक्यातील एका गरोदर मातेचाही मृत्यू झाला आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीHealthआरोग्यDeathमृत्यू