शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 00:44 IST

परभणी रेल्वेस्थानकावरून धावणारी निजामाबाद-पंढरपूर ही रेल्वे गाडी एक महिन्यासाठी रद्द केल्याने पंढरपूरसह परळी, गंगाखेडकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणी रेल्वेस्थानकावरून धावणारी निजामाबाद-पंढरपूर ही रेल्वे गाडी एक महिन्यासाठी रद्द केल्याने पंढरपूरसह परळी, गंगाखेडकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे़पंढरपूरजवळ रेल्वे मार्गाचे काम सुरू असल्याने दक्षिण-मध्य रेल्वे प्रशासनाने निजामाबाद-पंढरपूर या रेल्वेगाडीबरोबरच निजामाबाद-पुणे, नांदेड-दौंड या गाड्या एक महिन्यासाठी बंद केल्या आहेत़ त्यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे़ सध्या अधिकमास सुरू असून, या काळात पंढरपूरला जाणाºया भाविकांची संख्या वाढते़ त्याचबरोबरच उन्हाळी सुट्यांमुळे रेल्वे गाड्यांना आधीच मोठ्या प्रमाणात गर्दी आहे़ उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या वाढविण्याऐवजी गाड्या रद्द केल्या जात असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे़ गाड्या रद्द करण्याऐवजी गाड्यांच्या वेळेत बदल करावा, अशी मागणी वारंवार केली असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे़रविवारी सायंकाळच्या सुमारास परभणी रेल्वेस्थानकावर पंढरपूरला जाण्यासाठी अनेक प्रवासी परभणी येथील रेल्वेस्थानकावर दाखल झाले होते़ ग्रामीण भागातील या प्रवाशांना रेल्वे गाडी रद्द झाली असल्याची माहिती नव्हती़ मात्र रेल्वेची वेळ झाल्यानंतर ही रेल्वे रद्द असल्याची घोषणा करण्यात आल्याने या प्रवाशांना रेल्वे ऐवजी पर्यायी वाहनाने पंढरपूरकडे रवाना व्हावे लागले़ अधिकमास असल्याने पंढरपूरला मोठ्या प्रमाणात भाविक जात आहेत़ मात्र रेल्वे रद्द झाल्याने या प्रवाशांची हेळसांड होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीTravelप्रवासrailwayरेल्वे