शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
4
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
5
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
6
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
7
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
8
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
9
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
10
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
11
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
12
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
13
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
14
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
15
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
16
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
17
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
18
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
19
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
20
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...

परभणी : ग्रामपंचायतस्तरावर होणार विकास आराखडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 00:55 IST

केंद्र तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांचे अभिसरण करून २०१९-२० या वर्षांत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले असून, शासनाकडून सबकी योजना सबका विकास अभियान राबविले जात आहे़ या अंतर्गत जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांवर जबाबदाºया सोपविण्यात आल्या आहेत. २ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत विशेष ग्रामसभेचे आयोजन करून ग्रामपंचायतस्तरावर विकास आराखडे तयार करण्यात येणार आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : केंद्र तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांचे अभिसरण करून २०१९-२० या वर्षांत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले असून, शासनाकडून सबकी योजना सबका विकास अभियान राबविले जात आहे़ या अंतर्गत जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांवर जबाबदाºया सोपविण्यात आल्या आहेत. २ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत विशेष ग्रामसभेचे आयोजन करून ग्रामपंचायतस्तरावर विकास आराखडे तयार करण्यात येणार आहेत़गाव आणि ग्रामपंचायत मुख्य केंद्र बिंदू मानून केंद्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज मंत्रालयाने २०१९-२० या वर्षांत विविध योजनांचे अभिसरण करून गाव पातळीवर विकास आराखडा तयार करण्याचे धोरण आखले आहे़ त्यासाठी सबकी योजना सबका विकास या योजनेंतर्गत लोकसहभागातून लोकांचा ग्रामपंचायत आराखडा हे विशेष अभियान राबविले जात आहे़ या अभियानांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या आहेत़ त्यासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत़आराखडा तयार करताना ग्रामपंचायतीसाठी दलित वस्ती, तांडा वस्ती, समाजकल्याण, आमदार, खासदार निधी, पाणंद रस्ता, २५:१५, जनसुविधा या कामांचे नियोजन केले जाणार आहे़ तसेच २०१८-१९ या वर्षाच्या आराखड्यात समाविष्ट नसलेली शाळा, अंगणवाडी, शौचालय बांधकाम हेही कामे ग्रामपंचायतींना घ्यावी लागणार आहेत़ त्यासाठी ग्रामसभेत याचे नियोजन करावे लागणार आहे़ग्रामपंचायतीने पंचवार्षिक ग्रामपंचायत विकास आराखड्यापैकी आतापर्यंत हाती घेण्यात आलेली कामे, उपक्रम, त्यावर झालेला खर्च, शिल्लक निधी आणि ग्रामपंचायतीसाठी २०१९-२० या वर्षांत मिळणारे उत्पन्न, इतर निधीची सविस्तर माहिती ग्रामसभेत द्यायची आहे़त्याचबरोबर या पूर्वी ग्रामसभेने ठरविलेला उपक्रम, गावच्या गरजा, अडचणी, त्यावरील उपाययोजना, आराखडा आणि इतर योजनांची आराखड्यात सांगड घालण्यात येणार आहे़ग्रामपंचायत विकास आराखड्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामांचा समावेश असल्याने त्यानुसार मनरेगाचाही आराखडा तयार केला जाणार आहे़अधिकाºयांना दिल्या जबाबदाºया४या अभियानात सुसंगतता यावी, यासाठी शासनाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा ग्रामीण विकास योजनेचे प्रकल्प संचालक यांना जबाबदाºया वाटून दिल्या आहेत़; परंतु, विकास आराखडा तयार करताना गाव पातळीवर प्रत्येक विभागाने विहित नमुन्यातील अहवाल उपस्थित राहून ग्रामसभेला देणे बंधनकारक आहे़ यात ग्रामपंचायत, शिक्षण, आरोग्य, पशूसंवर्धन, महिला बालकल्याण, ग्रामीण पाणीपुरवठा, लघु पाटबंधारे, बाधंकाम, सामाजिक न्याय, कृषी, महसूल, गृह, वन, वीज पुरवठा, एसटी महामंडळ या विभागाने मात्र योजनेच्या प्रारंभीच ग्रामसभेकडे पाठ फिरविली आहे. विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी ग्रामसभांना उपस्थित रहात नसल्याचे दिसत आहे.विशेष म्हणजे पाथरी तालुक्यातील मरडसगाव येथील १७ नोव्हेंबर रोजी ग्रामसभा घेण्यात आली़ या ग्रामसभेला उपस्थित राहण्याबाबत सर्वच विभागांना नोटिसा देण्यात आल्या होत्या़ मात्र इतर विभागाचे अधिकारी, कर्मचारी ग्रामसभेकडे फिरकलेच नाहीत़ त्यामुळे ग्रामसेवक, सरपंच आणि संपर्क अधिकारी यांच्या उपस्थितीत सभा झाली़ अनुस्थितीत कर्मचाºयांना नोटिसा काढल्या जाणार असल्याची माहिती ग्रामसेवक फंड यांनी दिली़असा आहे ग्रामसभेचा कार्यक्रम४पाथरी तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींतर्गत शासनाच्या सबकी योजना सबका विकास आराखडा यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे़ शासन निर्णयाप्रमाणे १ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबरपर्यंत ग्रामसभेचे नियोजन पूर्ण होणे अपेक्षित आहे़ पाथरी पंचायत समितीच्या वतीने १२ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या काळात तालुक्यात ४९ ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा आयोजित करण्याचे नियोजन केले आहे़ त्यासाठी ग्रामसेवकांसोबत संपर्क अधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीgram panchayatग्राम पंचायत