शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : हुल्लडबाजी करणाऱ्यांची कोठडीत रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 00:44 IST

वाढदिवस असल्याच्या कारणावरुन शहरात बुलेट व मोटारसायकलवर फिरुन हुल्लडबाजी करीत गोंधळ करणाºया तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास पोलीस मुख्यालय परिसरात करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : वाढदिवस असल्याच्या कारणावरुन शहरात बुलेट व मोटारसायकलवर फिरुन हुल्लडबाजी करीत गोंधळ करणाºया तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास पोलीस मुख्यालय परिसरात करण्यात आली.या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, शहरातील नानलपेठ परिसर व इतर ठिकाणचे तरुण बुलेट व मोटारसायकलवर फिरुन हुल्लडबाजी करीत होते. बुलेटच्या सायलन्सरमध्ये बदल करुन मोठ्याने आवाज काढला जात होता. तसेच वेगवेगळ्या घोषणा देऊन शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी हुल्लडबाजी करणाºयांना ताब्यात घेण्याचे आदेश पोलीस कर्मचाºयांना दिले. त्यानुसार नानलपेठ पोलीस ठाण्याच्या कर्मचाºयांनी या हुल्लडबाजांचा पाठलाग केला. पोलीस मुख्यालयाच्या परिसरात एक बुलेट व एक मोटारसायकल या दोन वाहनांवरील अबरार खान शब्बीर खान पठाण (३५), मो.शोएब अ.बशीर (२५), मो.मुखीद मो.आलीम (२३) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात आणले. येथे त्यांना याबाबतचा जाब विचारला असता अबरार खान याचा वाढदिवस असल्याने शहरात फिरत असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी पोलिसांनी या तिघांनाही चांगला चोपही दिला. तसेच त्यांना अटकही करण्यात आली. ही कारवाई पोनि.गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. सुनील पुंगळे, फौजदार देशमुख, पोकॉ.लटपटे, उमर, कसबे, मुजमुले, थोरवे, पवार, गुंगाणे, रेवले यांच्या पथकाने केली.जप्त केलेल्या बुलेटची आरटीओ कार्यालयाकडून तपासणी केली जाणार असून त्यानंतर वेगळा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोनि.गाडेकर यांनी सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस