शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

परभणी : पोलीस उपअधीक्षकांवर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 23:47 IST

गुरुवारी मध्यरात्री उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी गौतमनगर परिसरात नागरिकांच्या घरात घुसून महिला, वृद्ध, बालकांना मारहाण केली. ही बाब बेकायदेशीर असून उपविभागीय पोलीस अधिकाºयांवर कारवाई करावी, या मागणीसाठी २८ नोव्हेंबर रोजी निषेध मूकमोर्चा काढला जाणार असल्याची शनिवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : गुरुवारी मध्यरात्री उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी गौतमनगर परिसरात नागरिकांच्या घरात घुसून महिला, वृद्ध, बालकांना मारहाण केली. ही बाब बेकायदेशीर असून उपविभागीय पोलीस अधिकाºयांवर कारवाई करावी, या मागणीसाठी २८ नोव्हेंबर रोजी निषेध मूकमोर्चा काढला जाणार असल्याची शनिवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.या पत्रकार परिषदेत रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे म्हणाले, गुरुवारी रात्री दोन गटात मारहाणीची घटना घडल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय परदेशी यांच्यासह पोलीस कर्मचाºयांनी गौतनगरातील घराघरात घुसून महिलांना, वृद्ध आणि बालकांनाही मारहाण केली. घटनेतील आरोपींना पकडण्यासाठी आमचा विरोध नाही; परंतु, अशा पद्धतीने मारहाण करणे ही बाब निषेधार्ह आहे. अनेकांना झालेल्या घटनेची माहितीही नसताना त्यात गोवण्याचा प्रयत्न झाला. गौतमनगर भागातील पोलिसांची कारवाई चीड आणणारी असून या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत. या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय परदेशी यांना निलंबित करावे, त्यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी २८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता गौतमनगर भागातून निषेध मूकमोर्चा काढला जाणार आहे. त्यांच्यावर जोपर्यंत कारवाई केली जात नाही, तोपर्यंत सर्व आंबेडकरी जनता आंदोलन करेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. पोलिसांनी या भागात दहशत निर्माण करण्याचे काम केले. जाणीवपूर्वक वातावरण खराब करण्याचे कामही पोलिसांकडून झाल्याचा आरोप करण्यात आला. महिलांनीही त्यांना झालेल्या मारहाणी माहिती पत्रकार परिषदेत दिली.पोलीस प्रशासन हुकूमशाही पद्धतीने वागत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटून झालेल्या प्रकाराची माहिती दिली जाईल. रिपाइं देखील हा प्रश्न उचलून धरणार असल्याचे रिपाइंचे राज्य संघटक डी.एन. दाभाडे यांनी सांगितले. यावेळी सिद्धार्थ भराडे, भारिपचे डॉ.प्रवीण कनकुटे, एमआयएमचे जाकेर कुरेशी, कॉंग्रेस अल्पसंख्याक सेलचे नागेश सोनपसारे, रिपाइंचे उमेश लहाने, सुधीर कांबळे, रणजीत मकरंद यांनीही पोलिसांच्या भूमिकेचा निषेध नोंदविला. कोणतीही घटना झाल्यानंतर जाणीवपूर्वक गौतमनगरला टार्गेट केले जात असल्याचा आरोप करण्यात आला. पत्रकार परिषदेस प्रदीप वाव्हुळे, कैलास लहाने, अशिष वाकोडे, सुरेश काळे, संजय भराडे, धीरज कांबळे, संजय लहाने, संपत ननवरे, अमोल गायकवाड आदींची उपस्थिती होती. अरुण लहाने यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिस