शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात २१३ पाणी नमुने आढळले दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 19:14 IST

जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेमध्ये जिल्ह्यातील १०३० पाणी नमुन्यांची जून महिन्यात तपासणी करण्यात आली होती.

परभणी:  येथील जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेमध्ये जिल्ह्यातील १०३० पाणी नमुन्यांची जून महिन्यात तपासणी करण्यात आली होती. यातील २१३ पाणी नमुने दूषित आढळले असून यामध्ये वालूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सर्वाधिक १७ नमुने दूषित आढळले आहेत. 

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत गाव स्तरावरील पाणी स्त्रोतांचे नमुने घेऊन जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, लघु प्रयोगशाळेमध्ये या नमुन्याची तपासणी केली जाते. जून महिन्यातही प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत पाणी स्त्रोतांचे नमुने मागविण्यात आले होते. यामध्ये एकूण १०३० नमुने प्रयोगशाळेकडे प्राप्त झाले होते. या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यातील तब्बल २१३ नमुने दूषित आढळले आहेत.

परभणी तालुक्यातील दैठणा, जांब, पेडगाव, पिंगळी, झरी या पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २१५ पाणीस्त्रोतांचे  नमुने घेण्यात आले होते. यातील ४६ नमुने दूषित आढळले आहेत. परभणी तालुक्यातील पेडगाव व झरी या दोन आरोग्य केंद्रांतर्गत प्रत्येकी ११ नमुने दूषित आढळले आहेत. पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे, कंठेश्वर, कावलगाव, ताडकळस या आरोग्य केंद्रांतर्गत पाणीस्त्रोतांच्या १५१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. यापैकी ११  नमुने दूषित आढळले.

गंगाखेड तालुक्यातील धारासूर, कोद्री, महातपुरी, पिंपळदरी, राणीसावरगाव आरोग्य केंद्रांतर्गत ११४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यातील ४० नमुने दूषित आढळले. सोनपेठ तालुक्यातील ५६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यातील ७ नमुुने दूषित आढळले आहेत. पालम तालुक्यातील चाटोरी व रावराजूर या दोन आरोग्य केंद्रांतर्गत ७८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यातील १३ पाणी नमुने दूषित आढळले आहेत.

सेलू तालुक्यातील देऊळगाव गात व वालूर आरोग्य केंद्रांतर्गत ७४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यातील २६ नमुने दूषित आढळले आहेत. मानवत तालुक्यातील कोल्हा व रामपुरी आरोग्य केंद्रांतर्गत ९३ नमुन्यांपैकी १७ नमुने दूषित आढळले आहेत. जिंतूर तालुक्यातील आसेगाव, आडगाव, चारठाणा, कौसडी, वझर, येलदरी अंतर्गत १८५ नमुन्यांपैकी ३६ नमुने दूषित आढळले तर पाथरी तालुक्यातील बाभुळगाव, हादगाव, पाथरगव्हाण, वाघाळा आरोग्य केंद्रांतर्र्गत ६४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यातील १७ पाणी नमुने दूषित आढळले आहेत. 

पाथरगव्हाण येथे एकही नमुना दूषित नाहीपाथरी तालुक्यातील पाथरगव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावातील १८ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एकही पाणी नमुना दूषित आढळला नाही. तर सेलू तालुक्यातील वालूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ४९ पाणी नमुन्याची तपासणी करण्यात आली. यातील १७ नमुने दूषित आढळले आहेत. दूषित आढळलेल्या पाणीस्त्रोताचे पाणी पिण्यासाठी वापरु नये, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 

टॅग्स :WaterपाणीParabhani civil hospitalजिल्हा रुग्णालय परभणीParbhani z pपरभणी जिल्हा परिषद