शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : वादळाने फळबागांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:45 IST

तालुक्यासह परभणी शहरात ३१ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अचानक वादळी वारे व पाऊस झाल्याने फळबागांचे नुकसान होऊन घरावरची पत्रे उडून गेल्याची घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : तालुक्यासह परभणी शहरात ३१ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अचानक वादळी वारे व पाऊस झाल्याने फळबागांचे नुकसान होऊन घरावरची पत्रे उडून गेल्याची घटना घडली.परभणी तालुक्यातील आर्वी, शहापूर व कुंभारी परिसरात ३१ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यांसह पावसास सुरुवात झाली. त्यामुळे शेतात उभ्या असलेल्या फळबागांना मोठा फटका बसला. आर्वी येथील सुरेश अश्रोबा कदम यांच्या शेतातील केळी पिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच टाकळी कुंभकर्ण शिवारात असलेल्या शहापूर येथील एका शेतकºयाच्या फळ बागांचे नुकसान झाले. या नुकसानीचा शुक्रवारी तालुका कृषी अधिकारी प्रभाकर बनसावडे यांनी प्रत्यक्ष जावून पंचनामा केला. परभणी शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात वादळी वाºयाने अनेक झाडे उन्मळून पडली होती. झाडाखाली उभ्या असलेल्या चार दुचाकींचे नुकसान झाले. तसेच शहरातील संत गाडगेबाबा नगरातील सूमनबाई किसन सदर यांच्या घरावर झाड पडून घराचे नुकसान झाले. तसेच सूमनबाई सदर यांच्या हाताला दुखापत झाल्याची घटना घडली. परभणी तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये घरावरची पत्रे उडून गेल्याच्या घटना घडल्या. गुरुवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाºयासह पावसामुळे तालुक्यात १० तास वीज गूल होती.बोरीत १८ तास वीज गायबजिंतूर तालुक्यातील बोरी येथे गुरुवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अचानक वादळी वारे व पाऊस झाल्याने महावितरणचे विद्युत पोल उखडून पडले. यामुळे बोरी उपकेंद्रांतर्गत असलेल्या ४० गावांचा वीज पुरवठा १८ तास बंद होता. शुक्रवारी दुपारी दीड वाजता हा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. या पावसामुळे उकाडा वाढला असून नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. तसेच बोरी व परिसरात वादळी वाºयामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा महसूल प्रशासनाने पंचनामा करावा, अशी मागणी होत आहे.नाथरा, उमरा येथील घरांवरील पत्रे उडालेपाथरी- तालुक्यातील नाथरा व उमरा गावात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास सोसाट्याच्या वाºयासह पाऊस झाला. यावेळी झालेल्या वाºयामुळे गावातील अनेक घरांवरील पत्रे उडून गेली. तर मोठ मोठी वृक्ष उन्मळून पडली. त्याच बरोबर महावितरण कंपनीचे ८ विद्युत खांबही कोसळून पडले आहेत. गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. उमरा येथील अनेक घरांवरील पत्रे उडून झाडे कोळसली आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊस