शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

परभणी : अनाथ बालकांसाठी सायकल मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:50 IST

एच.आय.व्ही. बाधित अनाथ मुलांच्या शिक्षण, आरोग्य व पुनर्वसन या विषयावर जनजागृती करण्यासाठी येथील होमिओपॅथीक अकादमी आॅफ रिसर्च अ‍ॅण्ड चॅरीटीज् या संस्थेच्या वतीने ८०० कि.मी. अंतराच्या सायकल मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. २५ नोव्हेंबर रोजी पुणे येथून ही मोहीम सुरू होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: एच.आय.व्ही. बाधित अनाथ मुलांच्या शिक्षण, आरोग्य व पुनर्वसन या विषयावर जनजागृती करण्यासाठी येथील होमिओपॅथीक अकादमी आॅफ रिसर्च अ‍ॅण्ड चॅरीटीज् या संस्थेच्या वतीने ८०० कि.मी. अंतराच्या सायकल मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. २५ नोव्हेंबर रोजी पुणे येथून ही मोहीम सुरू होणार आहे.होमिओपॅथीक अकादमीचे अध्यक्ष डॉ.पवन चांडक यांनी यापूर्वीही अशा प्रकारच्या मोहिमा राबविल्या आहेत. २५ नोव्हेंबर रोजी पुणे रेल्वे स्टेशन येथून या मोहिमेला सुरुवात होणार असून, थेऊर, जेजुरी, मोरगाव, सिद्धटेक, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री, महाड, पाली, रायगड व पुणे या मार्गावर सायकलद्वारे प्रवास केला जाणार आहे. ८०० कि.मी. अंतराचा हा प्रवास पुणे, अहमदनगर, नाशिक, अलीबाग या चार जिल्ह्यातून सह्याद्रीच्या पर्वत रांगातून अवघड असा ताम्हीणी घाट मार्गे सायकलवर केला जाणार असल्याचे डॉ.चांडक यांनी सांगितले.या प्रवासादरम्यान विविध सामाजिक संस्था, सायकलिंग ग्रुप, रोटरी क्लब, आनंदवन व सोमनाथ श्रमसंस्कार शिबिरार्थी आदींच्या वतीने आयोजित केलेल्या जनजागृती कार्यक्रमात डॉ.पवन चांडक मार्गदर्शन करणार आहेत.राज्यात अजूनही एच.आय.व्ही. बाधित बालकांचे शिक्षण व पुनर्वसनाचे प्रश्न कायम आहेत. या प्रश्नांवर जनजागृतीची आवश्यकता असल्याने दरवर्षी अशा मोहिमा राबवून जनजागृतीचे काम केले जात असल्याचे डॉ.पवन चांडक यांनी सांगितले.यापूर्वीही केल्या सायकल मोहिमा४डॉ.पवन चांडक यांनी यापूर्वी मुंबई ते कोकण (४०० कि.मी.), परभणी ते पणजी (७५० कि.मी.), पंढरपूर (३०० कि.मी.), विदर्भ सायकलवारी (८२० कि.मी.), पुणे- महाबळेश्वर (३८० कि.मी.), सुरत- चित्तोडगड- गुजरात- राजस्थान (८०० कि.मी.), गडचिरोली (२८० कि.मी.), पुणे- पंढरपूर-कुर्डूवाडी (३५० कि.मी.) व बेंगलोर- केरळ-कन्याकुमारी (१ हजार कि.मी) आदी सायकल मोहिमा केल्या आहेत.४ यावर्षीही ८०० कि.मी. अंतराची सायकल मोहीम आखली आहे. शुक्रवारी डॉ.पवन चांडक परभणी येथून पुणे येथे रवाना झाले. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शहरातील सायकलिस्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :parabhaniपरभणीEducationशिक्षणHelenहेलन