शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : तुती लागवडीचे १२८ हजेरी पत्रक पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 00:22 IST

महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यात सुरू असलेल्या तुती लागवड कामावरील चार गावातील मजुरांचे १२८ हजेरीपत्रक कालावधी संपला तरी एमआयएस झाले नाही. त्यामुळे मजुरांमध्ये जिल्हा रेशीम कार्यालयाच्या कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी) : महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यात सुरू असलेल्या तुती लागवड कामावरील चार गावातील मजुरांचे १२८ हजेरीपत्रक कालावधी संपला तरी एमआयएस झाले नाही. त्यामुळे मजुरांमध्ये जिल्हा रेशीम कार्यालयाच्या कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.राज्य शासनाने २०१६ पासून राज्यात मनरेगा योजनेंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेत रेशीम उद्योग तुती लागवड कार्यक्रमास मंजुरी दिली आहे. जिल्हा रेशीम विकास अधिकारी या कार्र्यान्वित यंत्रणेमार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. शासनाने मनरेगा योजनेत प्रती लाभार्थी शेतकऱ्यांना २ लाख ९५ हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अनेक लाभार्थी शेतकरी या योजनेत सहभागी झाले आहेत. पूर्णा तालुक्यात मागील काही वर्षापासून रेशीम उद्योग तेजीत आहे. राज्य शासनाने मनरेगा योजनेत तुतीचा समावेश केल्यापासून शेतकºयांची संख्या वाढली आहे. २०१७-१८ आणि २०१८-१९ या वर्षात पूर्णा तालुक्यात मंजूर असलेली कामे सुरू आहेत. तहसील कार्यालयातून काढण्यात आलेल्या १२८ ई-मस्टरचा कालावधी ७ आॅक्टोबर रोजी समाप्त झाला आहे. असे असताना कामांच्या मजुरांचे ई-मस्टर एमआयएसवरून अदगाई करण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालयाकडून तहसील कार्यालयात दाखल झाले नाहीत. याबाबत होत असलेल्या दिरंगाईचा दोन दिवसात खुलासा करावा, अशी नोटीस तहसीलदारांंंनी जिल्हा रेशीम अधिकाºयांना काढली आहे.मंगळवार नावालाचहिंगोली येथील जिल्हा रेशीम अधिकारी यांच्याकडे सध्या परभणी कार्यालयाचा पदभार आहे. दर मंगळवारी परभणी कार्यालयात त्यांची भेट असते. मात्र एकदा मंगळवार चुकला की ते येत नसल्याने फाईलींचा ढिगारा साचतो. दोन आठवड्यापासून ते कार्यालयात आले नसल्याने सर्व कामे खोळंबली आहेत.या गावांचा समावेशमहात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजनेंतर्गत पूर्णा तालुक्यात सुरू असलेल्या तुती लागवड कामांपैकी १२८ ई-मस्टर प्रलंबित आहेत. यामध्ये वझूर ५९, ताडकळस ६, देऊळगाव दुधाटे ३२ व देवठाणा येथील ३१ कामांचा समावेश आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीMONEYपैसा