शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

परभणी :पंधरा दिवसांपासून कापूस खरेदी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 00:01 IST

महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या वतीने तालुक्यातील बाभळगाव येथे आधारभूत किमतीमध्ये कापूस खरेदी सुरुवात करण्यात आली; परंतु, मागील पंधरा दिवसांपासून अचानक ही कापूस खरेदी बंद करण्यात आल्याने कापूस उत्पादकांना आपला माल खाजगी व्यापाऱ्यांकडे कवडीमोल दराने विकावा लागत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी): महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या वतीने तालुक्यातील बाभळगाव येथे आधारभूत किमतीमध्ये कापूस खरेदी सुरुवात करण्यात आली; परंतु, मागील पंधरा दिवसांपासून अचानक ही कापूस खरेदी बंद करण्यात आल्याने कापूस उत्पादकांना आपला माल खाजगी व्यापाऱ्यांकडे कवडीमोल दराने विकावा लागत आहे़पाथरी तालुक्यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय उपलब्ध असल्याने शेतकरी नगदी पिक म्हणून ओळखल्या जाणाºया कापूस पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करतो़ या वर्षीच्या खरीप हंगामातही शेतकºयांनी कापूस पिकालाच प्राधान्य दिले़ जून ते सप्टेंबर महिन्यात कमी अधिक महिन्यात झालेल्या पावसावर शेतकºयांची पीकेही चांगली बहरली़ त्यातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा होती; परंतु, आॅक्टोबर महिन्यात पाथरी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे शेतकºयांच्या हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला़ सध्या निसर्गाच्या तावडीतून सुटलेल्या पिकातून मिळालेले उत्पन्न बाजारपेठेत विक्रीसाठी येत आहे़राज्य शासनाच्या कापूस पणन महासंघाच्या वतीने पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथील जिनींगमध्ये कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात आले़ बाजारातील भाव आणि हमीभाव यामध्ये मोठी तफावत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी आपला कापूस विकण्यासाठी बाभळगाव गाठू लागले; परंतु, या ठिकाणी कापूस साठविण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याने बाभळगाव येथील जिनींगवरील खरेदी केंद्र बंद करावे लागले़ त्यानंतर पणन महासंघाच्या वतीने खेडूळा येथील जिनींगवर खरेदी सुरु केली ; परंतु, याही ठिकाणी कापूस साठवण करण्यास जागा शिल्लक राहिली नाही़ बाजार समितीच्या आवारात कापसाची वाहने लावुन जिनींगवर पाठविण्या येत होती ; परंतु, पणन महासंघाच्या वतीने मागील पंधरा दिवसांपासून ढगाळ वातावरणाचे कारण देवून कापूस खरेदी बंद करण्यात आली़ परिणामी आधारभूत किंमतीतील कापूस खरेदी बंद झाल्याने शेतकºयांना आपला शेतमाल खाजगी व्यापाºयांना कवडीमोल दरात विकावा लागत आहे़ त्यामुळे याकडे बाजार समिती, तालुका प्रशासन व जिल्हा प्रशासनाने लक्ष देवून बंद पडलेली कापूस खरेदी तत्काळ पणन महासंघाला सुरु करण्यासाठी आदेशित करावे, अशी मागणी तालुक्यातील कापूस उत्पादकांतून होत आहे़ग्रेडर नाही कापूस खरेदी बंद४पाथरी तालुक्यातील बाभळगाव व खेडूळा या ठिकाणी पणन महासंघाच्या वतीने कापूस खरेदी सुरु करण्यात आली़ राज्य शासनाने ठरवुन दिलेला ५ हजार ५५० रुपयांचा हमीभाव ही शेतकºयांना मिळू लागला; परंतु, मागील पंधरा दिवसांपासून ढगाळ वातावरणाचे कारण देत कापूस खरेदी बंद करण्यात आली आहे़ विशेष म्हणजे मागील आठ दिवसापासून तालुक्यात कुठेही ढगाळ वातावरण दिसून आले नाही़४कापूस उत्पादक शेतकरी दररोज बाजार समितीमध्ये कापूस खरेदी कधी सुरु केली जाणार अशी विचारणा करण्यासाठी ये-जा करीत आहेत़ मात्र बाजार समिती प्रशासन समितीकडूनही समाधानकारक उत्तर मिळत नाही़ विशेष म्हणजे पणन महासंघाच्या वतीने बंद करण्यात आलेली कापूस खरेदीही केवळ ग्रेडर मिळत नसल्यानेच बंद आहे अशी माहिती मिळत आहे़परभणीत मात्र कापूस खरेदी सुरूपाथरी येथे एकीकडे ढगाळ वातावरणाच्या कारणावरून पणन महासंघाने कापूस खरेदी बंद केली असली तरी परभणीत मात्र कापूस खरेदी सुरू ठेवली आहे़ १३ जानेवारी रोजी परभणी बाजार समितीत महासंघाने प्रतिक्विंटल ५ हजार ३५० ते ५ हजार ५०० रुपये दराने कापसाची खरेदी केली़ खाजगी व्यापाºयांनी मात्र परभणी ५ हजार १०० रुपये ते ५ हजार ४३५ रुपये प्रतिक्विंटल दराने कापसाची खरेदी केली़कापूस उत्पादक शेतकºयांचा शासकीय कापूस खरेदीवर जास्त भरोसा आहे़ शेतकरी दररोज बाजार समितीकडे कापूस खरेदी केंव्हा सुरु होणार आहे, अशी विचारणा करीत आहेत़ त्यामुळे शेतकºयांची गैरसोय टाळण्यासाठी पणन महासंघाने तातडीने खरेदी केंद्र सुरु करावे़- एकनाथ शिंदे,उपसभापती, बाजार समिती, पाथरी़

टॅग्स :parabhaniपरभणीcottonकापूसFarmerशेतकरी