शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

परभणी :क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून वाद : २० जणांविरुद्ध गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 23:30 IST

क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून लहान मुलांमध्ये झालेल्या वादाचे पर्यावसन दोन गटातील मारहाणीत झाल्याने अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टसह विविध कलमान्वये दोन्ही गटातील २० जणांविरुद्ध शनिवारी पहाटे गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून लहान मुलांमध्ये झालेल्या वादाचे पर्यावसन दोन गटातील मारहाणीत झाल्याने अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टसह विविध कलमान्वये दोन्ही गटातील २० जणांविरुद्ध शनिवारी पहाटे गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.शहरातील बरकत नगर व सर्जेराव नगर येथील लहान मुले १२ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास क्रिकेट खेळण्यासाठी मोसीकॉल परिसरात गेले होती. तेथे शिवम वाव्हळे, अदित्य गायकवाड या दोन मुलांमध्ये क्रिकेट खेळण्यावरून दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास वाद झाला. या वादाची माहिती समजताच शिवम वाव्हळेचे आई-वडील तेथे पोहचले. तेव्हा तेथील इतर मुलांनी पळ काढला. त्याच वेळी अदित्य गायकवाड याचेही आई-वडील तेथे पोहचले.दोघांचा वाद सुुरु झाला. तेव्हा उपस्थित मध्यस्थांनी हा वाद मिटविला. त्यानंतर वाव्हळे कुटुंब घरी गेल्यानंंतर दुपारी ४ वाजता रामा गोविंद गायकवाड, सीताबाई रामा गायकवाड, अदित्य रामा गायकवाड, लक्ष्मण गोविंद गायकवाड यांच्यासह इतर पाच अनोळखी असे एकूण १२ जणांनी वाव्हळे यांच्या घरात घुसून जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण केली. त्याच बरोबर अरूणा पिराजी वाव्हळे, पिराजी वाव्हळे, शिवम वाव्हळे, शीतल वाव्हळे यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद अरूणा पिराजी वाव्हळे यांनी १३ एप्रिल रोजीच्या पहाटे गंगाखेड पोलीस ठाण्यात दिल्यावरून १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लांजिले हे करीत आहेत.दरम्यान, याच प्रकरणी रामा गोविंद गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिराजी वाव्हळे, अरूणा वाव्हळे, अशोक गायकवाड, शेषराव गायकवाड, अरूणा यांचा भाऊ, पिराजी वाव्हळे यांचा भाऊ आदींसह आठ जणांविरुद्ध मारहाण करून जखमी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राजेश राठोड हे करीत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी