शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी येऊन जाताच...! चुराचांदपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली, कुकी नेत्यांची घरे जाळली
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
4
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
5
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
6
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
7
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
8
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
9
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
10
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
11
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
12
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
13
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
14
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
15
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
16
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
17
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
18
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
19
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
20
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 

परभणी : ‘पाटबंधारे’च्या काम वाटपावरून कंत्राटदारांचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 11:48 IST

येथील जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक २ अंतर्गत येणा-या चा-या दुरुस्तीची कामे मजूर सहकारी सोसायट्यांना वाटप करीत असताना शासकीय नियम डावलले गेल्याच्या कारणावरून सोमवारी जायकवाडी वसाहत भागात कंत्राटदारांनी एकच गोंधळ केला़ त्यानंतर याबाबत थेट जिल्हाधिका-यांकडेही तक्रार करण्यात आली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक २ अंतर्गत येणा-या चा-या दुरुस्तीची कामे मजूर सहकारी सोसायट्यांना वाटप करीत असताना शासकीय नियम डावलले गेल्याच्या कारणावरून सोमवारी जायकवाडी वसाहत भागात कंत्राटदारांनी एकच गोंधळ केला़ त्यानंतर याबाबत थेट जिल्हाधिका-यांकडेही तक्रार करण्यात आली़शहरातील देशमुख हॉटेल परिसरातील जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यालय सातत्याने वादाचा विषय बनले आहे़ या कार्यालयातील विभाग क्रमांक २ चे कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर यांच्याविरोधात काही दिवसांपूर्वी त्यांच्याच कार्यालयातील कर्मचा-यांनी आंदोलन केले होते़ आता सलगरकर यांनी काम वाटपात सर्व नियम ढाब्यावर बसविल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत़ जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक २ अंतर्गत येणाºया माखणी, बेलखेडा, दहेगाव, रामपुरी, हमदापूर, भारस्वाडा, इंदेवाडी, टाकळगाव, वझूर, ब्रह्मपुरी, दैठणा, धानोरा, पेडगाव, आंबेगाव, लिंबा, चिंचोली, येलदरी आदी गाव शिवारातील वितरिका आणि लघु वितरिकांची दुरुस्ती, मुख्य कालवा दुरुस्ती, फरशी दुरुस्ती, साचलेला गाळ, गवत काढणे, कॅनॉलच्या साईडने मुरूम टाकून उंची वाढविणे आदी कामांचा समावेश आहे़तब्बल ४ कोटी ४ लाख ८७ हजार रुपयांच्या ३९ कामांचे सलगरकर यांनी मजूर सहकारी संस्थांना वाटप केले़ शासन निर्णयानुसार कामाचे वाटप करीत असताना ३३ टक्के कामे मजूर सहकारी सोसायट्यांना, ३३ टक्के कामे सुशिक्षीत बेरोजगार संघटना यांना व ३४ टक्के कामे खुल्या निविदा प्रक्रियेंतर्गत देणे आवश्यक आहे़ परंतु, कार्यकारी अभियंता सलगरकर यांनी सर्व शासनाचे नियम पायदळी तुडवित मजूर सहकारी सोसायट्यांनाच सर्वच्या सर्व कामे वाटप केल्याच्या इतर कंत्राटदारांनी तक्रारी केल्या़ त्यानुसार सोमवारी दुपारी २ च्या सुमारास या कार्यालयात मोठ्या प्रमाणात कंत्राटदार व राजकीय नेते उपस्थित झाले़त्यावेळी कार्यकारी अभियंता सलगरकर कार्यालयात उपस्थित नव्हते़ शिवाय त्यांचा मोबाईलही बंद होता़ त्यामुळे कंत्राटदारांनी एकच गोंधळ केला़ काहींनी त्यांच्या निवासस्थानाकडे धाव घेतली; परंतु, तेथेही ते उपस्थित नव्हते़त्यामुळे काही कंत्राटदारांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकारी प़ शिव शंकर यांची भेट घेतली व त्यांच्या कानावर हा प्रकार घातला़ त्यानंतर जिल्हाधिका-यांनी कार्यकारी अभियंता सलगरकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु, त्यांचा मोबाईल बंद होता़ त्यामुळे त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी बीडकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावले़ यावेळी बीडकर यांनी कार्यालयात येऊन या संदर्भातील कागदपत्रे आपल्याकडे उपलब्ध नसल्याचे सांगितले़ त्यानंतर जिल्हाधिकाºयांनी या संदर्भात पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंत्यांशी संपर्क साधून त्यांच्या कानी हा प्रकार घातला़ त्यानंतर कंत्राटदार निघून गेले़दरम्यान, सलगरकर यांच्या या निर्णयाविषयी विविध राजकीय पक्षाचे नेते व कंत्राटदारांनी संताप व्यक्त केला़ त्यांचा मनमानी पद्धतीने कारभार सुरू असतो़ शासनाचे नियम डावलून ते निर्णय घेत आहेत़ त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशीही मागणी यानिमित्ताने जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आली आहे़सलगरकर यांच्याविषयी यापूर्वीही तक्रारीजायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर यांच्याविषयी यापूर्वीही त्यांच्या कार्यालयातील कर्मचा-यांनीच तक्रारी केल्या आहेत़ विशेष म्हणजे या कर्मचा-यांनी सलगरकर यांच्यावर आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात आरोप करून काम बंद आंदोलनही केले होते़ आता कंत्राटदारांनीही शासनाचे नियम डावलून कामाचे सलगरकर यांनी वाटप केल्याचा आरोप केला आहे़ या संदर्भात प्रतिक्रियेसाठी सलगरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल बंद होता़