शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पालम तालुक्यात बोअरवेलने जमिनीची अक्षरश: चाळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 23:53 IST

तालुक्यात मागील १५ दिवसांपासून पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी व जनावरांच्या पाण्यासाठी ग्रामीण भागात बोअर घेण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे जमिनीची अक्षरश: चाळणी होत असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी) : तालुक्यात मागील १५ दिवसांपासून पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी व जनावरांच्या पाण्यासाठी ग्रामीण भागात बोअर घेण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे जमिनीची अक्षरश: चाळणी होत असल्याचे दिसून येत आहे.तालुक्यात यावर्षी पावसाळ्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे. याचा फटका शेतकऱ्यांना सर्वाधिक बसला आहे. खरीप व रबी या दोन्ही हंगामातील पिकांनी शेतकऱ्यांना धोका दिल्याने आर्थिक संकट ओढवले आहे. पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. घागरभर पाण्यासाठी रात्र-रात्र जागून काढण्याची वेळ आलेली आहे. त्याच बरोबर शेतात जनावरांना पिण्याचे पाणी, चारा व थोडीफार बागायती पिके, भाजीपाला जगविण्यासाठी शेतकऱ्यांची केविलवाणी धडपड सुरू झालेली आहे. बहुतांश शेतकºयांकडे सिंचन विहिरी नाहीत. तर ज्यांच्याकडे सिंचन विहिरी आहेत, त्या शेतकºयांच्या विहिरीच्या पाण्याची पातळी खालावलेली आहे. त्यामुळे पाण्याचा शोध घेत शेतकरी बोअरवेल घेण्याकडे वळले आहेत. नवीन बोअरवेल घेतले जात आहेत. लागेल तेवढ्या पाण्याचा काटेकोर वापर केला जात आहे. बोअरवेलची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जमिनीची मात्र अक्षरश: चाळणी होत असल्याचे दिसत आहे. तालुक्यात गोदावरीचे पात्र कोरडे पडले असून इतरत्र एकही साठवण तलाव नाही. त्यामुळे शेतकºयांना पाण्यासाठी बोअरवेल घेण्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध राहिलेला नाही.बोअरवेल : किमान ६० हजारांचा खर्चनवीन बोअरवेल घेण्यासाठी शेतकºयांची धडपड सुरू झालेली आहे. मशीन एजंटाच्या मागे शेतकरी पंधरा-पंधरा दिवस फिरत आहेत. एक बोअरवेल खोदण्यासाठी जेमतेम २५ ते ३० हजार रुपयांचा खर्च केला जात आहे. तसेच या बोअरवेलवर पाईप व विद्युत मोटार टाकण्यासाठी ३० हजारांचा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकºयांना पाण्यासाठी पदरमोड करीत ६० हजार रुपयांचा खर्च करावा लागत असून शेतकरी अडचणीत सापडले आहेत.अधिकाºयांनी लावली शेतकºयांची वाटदुष्काळी परिस्थिती असल्याने यावर्षी रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकºयांनी पंचायत समितीकडे ७०० प्रस्ताव दाखल केले होते. या प्रस्तावांना छाननी समितीने मंजुरी दिली होती. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांनी ३८० सिंचन विहिरींच्या मंजुरीसाठी पुढाकार घेतला होता. मात्र ही कामे आचारसंहिता लागण्यापूर्वी झाली असती तर बोअरवेल घेण्याचे प्रमाण कमी झाले असते; परंतु, जनतेची सेवा करण्यासाठी शासनाने नेमलेल्या अधिकाºयांनीच शेतकºयांचा घात केला असून दुष्काळी परिस्थितीत वाट लावण्याचे काम केले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई