शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : बालगोपाळांच्या दिंडीने शहर दुमदुमले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 01:00 IST

आषाढी एकादशीनिमित्त विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सोमवारी शहरातून काढलेल्या बालगोपाळांच्या दिंडीत विविध शाळांमधील चिमुकले विद्यार्थी वेगवेगळ्या वेशभूषेत सहभागी झाले होते. ‘ज्ञानोबा तुकाराम’चा जयघोष करीत निघालेल्या दिंडीने शहर दुमदुमून गेले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: आषाढी एकादशीनिमित्त विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सोमवारी शहरातून काढलेल्या बालगोपाळांच्या दिंडीत विविध शाळांमधील चिमुकले विद्यार्थी वेगवेगळ्या वेशभूषेत सहभागी झाले होते. ‘ज्ञानोबा तुकाराम’चा जयघोष करीत निघालेल्या दिंडीने शहर दुमदुमून गेले.आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी शहरातून बालगोपाळांची दिंडी काढली जाते. सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास माळीगल्लीतील विठ्ठल मंदिरात माजी महापौर प्रताप देशमुख यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी विश्वहिंदू परिषदेचे प्रांतमंत्री अनंत पांडे, पत्रकार विजय जोशी, संतोष धारासूरकर, विहिंपचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र शहाणे, प्रल्हादराव कानडे, सुनील रामपूरकर, शिवप्रसाद कोरे, अभिजीत कुलकर्णी, गोपाळ रोडे आदींची उपस्थिती होती. या ठिकाणाहून बालगोपाळांच्या दिंडीला प्रारंभ झाला. नारायणचाळ, गांधीपार्क, गुजरी बाजार, शिवाजी चौकमार्गे विद्यानगरापर्यंत ही दिंडी काढण्यात आली. दिंडीत शहरातील १२ शाळांमधील सुमारे २ हजार ८०० विद्यार्थी सहभागी झाल होते. वासवी वनिता क्लबच्या वतीनेही दिंडीचे स्वागत करण्यात आले. यावेळी रुपा कत्रुवार, अनघा वट्टमवार, अंजली मुक्कावार व पदाधिकारी उपस्थित होते. बाल चिमुकल्यांनी विठ्ठल, रुख्मिणीसह विविध संतांचे सजीव देखावे सादर केले. टाळ-मृदंगाचा गजर करीत हरिनामाचा जयघोष करीत निघालेल्या या दिंडीचे शहरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.

टॅग्स :parabhaniपरभणीAshadhi Ekadashiआषाढी एकादशीStudentविद्यार्थी