शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: शैक्षणिक नगरीला मद्य विक्री दुकानांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 23:51 IST

सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिकदृष्ट्या नवलौकिक असलेले सेलू शहर चोहूबाजूने मद्य दुकानांच्या विळख्यात सापडले आहे. परभणी जिल्ह्यात सर्वाधिक परवानाधारक परमीट रूम व इतर दारुंची दुकाने शहरात असल्याने दररोज शेकडो लिटर दारुची विक्री होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी) : सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिकदृष्ट्या नवलौकिक असलेले सेलू शहर चोहूबाजूने मद्य दुकानांच्या विळख्यात सापडले आहे. परभणी जिल्ह्यात सर्वाधिक परवानाधारक परमीट रूम व इतर दारुंची दुकाने शहरात असल्याने दररोज शेकडो लिटर दारुची विक्री होत आहे.मराठवाड्यातील पुणे म्हणून शहराची काही वर्षापूर्वी ओळख होती. दर्जेदार शिक्षण देणाऱ्या संस्था तसेच सामाजिक चळवळीचे अनेक वर्षे सेलू हे केंद्र राहिलेले आहे. येथे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून दिग्गज कलाकारांनी व्यासपीठ गाजविलेले आहे. नाट्य परंपरेचा मोठा वारसा शहराला लाभलेला आहे; परंतु, अलिकडच्या काळात बीअरबारची झपाट्याने वाढलेली संख्या चिंतेचा विषय बनला आहे. शहरात शैक्षणिक वातावरण असल्याने जिल्ह्यातील विविध शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांचे मोठे वास्तव्य आहे. त्यामुळेच चारही बाजूंनी शहराचा विस्तार वाढत गेला आहे. त्यातच नोकरदार वर्ग, शहरात राहण्यासाठी सेलूला पसंती देतात. मात्र वाढत्या विस्तारासोबतच परमीट रुमची संख्या पाहता सेलूने इतर शहराला दारूच्या दुकानाच्या बाबतीत मागे सोडल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार शहरात एफएल-३ चे २० परवानाधारक परमीट रुम आहेत. तसेच देशी दारुचे ३ परवानाधारक दुकाने असूून, ४ बीअरशॉपी तर १ वॉईन शॉप आहे. या परवानाधारक दारूच्या दुकानातून मोठ्या प्रमाणात मद्य विक्री होत आहे. काही परमीट रुममध्ये दारूच्या भावात तफावत असल्याची माहिती आहे. काही परमीट रुममध्ये कमी दराने काही मध्ये दारूचा भाव अधिक असल्याचे समजते.दरम्यान, देशी दारूच्या दुकानातून बॉक्सचे बॉक्स ग्रामीण भागात अवैध देशी दारू विक्री करणारी मंडळी छुप्या मार्गाने नेत असतात. संबंधित विभागातील अधिकारी ठरल्याप्रमाणे केवळ कागदपत्रे तपासणी करून पुढे निघतात. परमीट रुमपेक्षा कमी दरात वॉईनशॉपवर दारू मिळत असल्याने सायंकाळी या दुकानांसमोर चांगलीच गर्दी असते. येथून दारू घेऊन रात्रीच्या वेळी शहरातील मोकळ्या मैदानातच कमी खर्चात मद्यपीच्या पार्ट्या रंगतात. काही दिवसात आणखी परमीट रूमची संख्या वाढली तर आश्यर्च वाटायला नको, अशी परिस्थिती शहरात दिसत आहे.चोहू बाजूने विळखासेलू शहराच्या चोहू बाजुुंनी मद्यांच्या दुकानाचा विळखा आहे. सेलू ते सातोना रोड, सेलू-परभणी, सेलू- देवगावफाटा तसेच सेलू-पाथरी या रस्त्यावर परमीट रुमची संख्या अधिक आहे. तसेच रायगड कॉर्नर ते रेल्वेस्थानक या मुख्य रस्त्यावरही दुकानांची मोठी रेलचेल आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीEducationशिक्षण