शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : तलाठ्यास चापट मारून वाहनचालक फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:50 IST

तालुक्यातील पिंपरी शिवारात जप्त केलेल्या वाळू साठ्यातून वाळूची चोरी करताना पकडलेल्या वाहनाच्या मालकाने तलाठ्याला चापट मारुन त्या ठिकाणाहून पळ काढल्याची घटना २४ फेब्रुवारी रोजी घडली असून या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात वाहनचालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): तालुक्यातील पिंपरी शिवारात जप्त केलेल्या वाळू साठ्यातून वाळूची चोरी करताना पकडलेल्या वाहनाच्या मालकाने तलाठ्याला चापट मारुन त्या ठिकाणाहून पळ काढल्याची घटना २४ फेब्रुवारी रोजी घडली असून या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात वाहनचालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदीतून वाळूचा बेसुमार उपसा होत असल्यासंदर्भात २३ फेब्रुवारी रोजी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन जिल्हा खणीकर्म अधिकारी विद्या खरवडकर यांनी शनिवारी पिंपरी येथील गोदावरी नदीपात्रास भेट दिली. तसेच ६० ते ७० ब्रास वाळूचा साठा जप्त केला. जप्त केलेल्या या वाळूची देखरेख करण्याची जबाबदारी तलाठी चंद्रकांत साळवे यांच्याकडे दिली होती. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास या वाळू साठ्यातून एक हायवा ट्रक वाळू भरुन नेत असल्याचे तलाठी साळवे व तलाठी अक्षय नेमाडे यांना दिसले. तलाठी आल्याचे लक्षात येताच एम.एच.४५- १२६७ या क्रमांकाच्या ट्रक चालकाने तेथून पळ काढला. तलाठी साळवे व नेमाडे यांनी या ट्रकचा पाठलाग करुन पिंपरी शिवारातील कचरा डेपोजवळ ट्रक थांबविला. चालक हनिफ पठाण याच्याकडून चावी ताब्यात घेतली. तेव्हा दुचाकीवरुन तेथे आलेल्या ट्रक मालक माधव साहेबराव शिंदे (रा.मसला) याने ट्रक का थांबविला, अशी विचारणा करुन तलाठी साळवे याच्यासोबत वाद घातला. त्यांना धक्का-बुक्की करुन त्यांच्या खिशातील ट्रकची चावी काढून घेतली. यावेळी शिंदे यांनी साळवे यांना चापटाने मारहाण केली. याचवेळी नायब तहसीलदार किरण नारखेडे, मंडळ अधिकारी शंकरराव राठोड, तलाठी शिवाजीराव मुरकुटे हे घटनास्थळी पोहचले. माधव शिंदे व हनिफ पठाण यांना ताब्यात घेऊन गंगाखेड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. या प्रकरणी तलाठी साळवे यांच्या फिर्यादीवरुन दोघांवर गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपनिरीक्षक रवि मुंडे तपास करीत आहेत.अवैध वाळू वाहतूक करणारे चार वाहने पकडली४पूर्णा- तालुक्यातील कान्हडखेड शिवारात अवैध वाळू उपसा करण्याच्या उद्देशाने उभे असलेले चार ट्रॅक्टर उपविभागीय अधिकाऱ्यांनी २४ फेब्रुवारी रोजी जप्त केले. कान्हडखेड शिवारातील पूर्णा नदीपात्रातून वाळूचा अवैध उपसा होत असल्याची माहिती मिळाल्याने उपविभागीय अधिकारी विश्वांभर गावंडे यांनी रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास कान्हडखेड येथे भेट दिली होती.४ यावेळी पूर्णा नदीच्या पात्र परिसरात उभे असलेले चार ट्रॅक्टर त्यांनी जप्त केले. हे चारही ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात जमा केले आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी