शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : चाकूचा धाक दाखवून कापूस व्यापाऱ्यास लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 00:03 IST

खरेदी केलेला कापूस विक्री करून परतत असताना टेम्पो आडवून चाकुचा धाक दाखवून कापूस व्यापाºयाचे ३ लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची घटना पाथरी तालुक्यातील सोनपेठ-पाथरी रोडवरील अमराईजवळ ६ जानेवारी रोजी रात्री ९.३० ते ९.४५ वाजेच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : खरेदी केलेला कापूस विक्री करून परतत असताना टेम्पो आडवून चाकुचा धाक दाखवून कापूस व्यापाºयाचे ३ लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची घटना पाथरी तालुक्यातील सोनपेठ-पाथरी रोडवरील अमराईजवळ ६ जानेवारी रोजी रात्री ९.३० ते ९.४५ वाजेच्या सुमारास घडली.शहरातील एकतानगर येथील कापसाचे व्यापारी पुरुषोत्तम सोमाणी यांनी ६ जानेवारी रोजी मोंढा परिसरात खरेदी केलेला अंदाजे १८३ क्विंटल कापूस टेम्पो क्रमांक एम.एच.०४-बी.डी. ६६२८ व एम.एच. ४५-०६१२ या दोन टेम्पोमध्ये भरून परळी तालुक्यातील धर्मापुरी येथील एसके जिनिंगमध्ये नेला होता. एम.एच. ४५/०६१२ या टेम्पोला भाडे असल्याने तो गंगाखेडला गेला. तर कापूस विक्री करून जनावरांना लागणारी २०० पोते पेंड एम.एच.०४ डी.डी.६६२८ या टेम्पोमध्ये भरून व जिनिंग मालकाकडून ३ लाख रुपये उचल घेऊन टेम्पो पाथरीकडे निघाला. हा टेम्पो सोनपेठ- पाथरी रोडवरील अमराई जवळ येताच पाठीमागून दुचाकीवरून तीन अज्ञात चोरटे आले. त्यांनी टेम्पोला ओव्हरटेक करून चालकाला काठीचा धाक दाखवून थांबविण्यास भाग पाडले. दुचाकी आडवी लावून चाकुचा धाक दाखवून टेम्पोचे दार उघडण्यास सांगितले. दार उघडताच चालक बाजूच्या शेतात पळाला. चोरांनी कॅबीनमध्ये प्रवेश करून पुरुषोत्तम सोमाणी यांना चाकुचा धाक दाखविताच भीती पोटी सोमाणी बाजूच्या शेतात जावून लपले. थोड्या वेळाने चोरट्यांनी दुचाकीवर पळ काढला. चोरटे गेल्याचे लक्षात येताच सोमाणी टेम्पोजवळ आले. डिक्कीमध्ये ठेवलेले ३ लाख रुपये व कापूस विक्री केलेल्या पावत्या, मफरेल हे दिसून न आल्याने चोरट्यांनी पैसे घेऊन गेल्याची खात्री झाली. त्याच वेळी सोमाणी यांनी मोबाईलवरून पाथरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पुरुषोत्तम सोमाणी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात तीन चोरट्यांविरुद्ध पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस