शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : अवैध दारूचा साठा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 23:38 IST

शहरातील भिकुलाल पेट्रोलपंपासमोर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने २५ फेब्रुवारी रोजी छापा टाकून अवैध दारुचा साठा जप्त केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील भिकुलाल पेट्रोलपंपासमोर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने २५ फेब्रुवारी रोजी छापा टाकून अवैध दारुचा साठा जप्त केला आहे.भिकुलाल पेट्रोलपंपासमोर आत्माराम धोंडीबा पवार, उमाजी मनोहर शिंदे (दोघे रा.खडाळा ता. पूर्णा) हे चोरुन दारु विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. तसेच नवा मोंढा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कैलास लक्ष्मणराव वाव्हळ व भगवान लेढे या दोघांनाही दारु विक्री करताना पोलिसांनी पकडले. या चारही आरोपींकडून दारुसाठ्यासह ८८ हजार १६१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.मटका जुगार अड्ड्यावर छापा४मटका जुगार या अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे. मानवत तालुक्यातील कोल्हा पाटी येथे एका हॉटेलमध्ये रामप्रसाद भोजीराम भिसे व लक्ष्मण नारायण भिसे हे मटका घेत असताना मिळून आले. तसेच गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथील बसस्थानकावर शेख इब्राहीम यास मटका घेत असताना पोलिसांनी पकडले आहे. दोन्ही कारवायांमध्ये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ४० हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल व एक मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रकाश कापुरे, सुरेश डोंगरे, हनुमंत जक्केवाड, मधुकर चट्टे, बाळासाहेब तुपसुंदरे, निलेश भूजबळ, हरि खुपसे, अरुण कांबळे, सय्यद मोबीन, भगवान भुसारे, दिलावर पठाण, जमीर फारोखी, कोनगुलवार, यशवंत वाघमारे यांनी या कारवाया केल्या.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी