शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
2
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
3
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
4
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
5
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
6
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
7
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
8
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका
9
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब आणि मुलावर गुन्हा दाखल; १५० हून अधिक लोकांना लाखोंचा फटका
10
Stock Market Today: सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण, निफ्टी ४० अंकांनी घसरला; Glenmark Pharma, Dixon Tech मध्ये तेजी
11
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
12
कुलदीप यादव सुसाट! जडेजा आणि मुरलीधरनचा रेकॉर्ड ब्रेक, मलिंगाचाही 'हा' विक्रम धोक्यात
13
पाकिस्तानची स्थिती बिकट होणार! भारतीय हवाई दलाला मिळणार ९७ तेजस विमाने
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार ७ नियम, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; ऑनलाइन गेमिंगपासून तिकिटापर्यंत आहे यादीत
15
Asia Cup 2025: हारिस रौफ आणि साहिबजादा फरहानवर बंदीची टांगती तलवार, मैदानातील गैरवर्तन महागात पडणार?
16
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
17
या संकटात बळीराजा तू एकटा नाहीस, अख्खा महाराष्ट्र सोबत आहे; हताश शेतकरी घेतायेत मृत्यूशी गळाभेट
18
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
19
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
20
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?

परभणी : युती झाली तरी गंगाखेड-पाथरीत भाजपचीच गोची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 00:27 IST

भारतीय जनता पार्टी व शिवसेनेची राज्यस्तरावर युती होणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे़ त्यानुसार राज्यात या पक्षांची युती झाली तरी पाथरी व गंगाखेड विधानसभा मतदारसंघात याचा फटका भाजपालाच बसण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : भारतीय जनता पार्टी व शिवसेनेची राज्यस्तरावर युती होणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे़ त्यानुसार राज्यात या पक्षांची युती झाली तरी पाथरी व गंगाखेड विधानसभा मतदारसंघात याचा फटका भाजपालाच बसण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे़२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाशिवसेना स्वबळावर लढले होते़ जिल्ह्यात परभणी व जिंतूरमध्ये भाजपाने तर गंगाखेडमध्ये रासपने आणि पाथरीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवडणूक लढविली होती़ तर शिवसेनेने चारही विधानसभा मतदार संघात निवडणूक लढविली होती़ या निवडणुकीत दोन ठिकाणी भाजपाला एकूण ७२ हजार ३६१ मते मिळाली होती तर शिवसेनेला ४ मतदार संघात एकूण १ लाख ५५ हजार ८६९ मते मिळाली होती़ तर गंगाखेडमध्ये भाजपाचा मित्र पक्ष रासपला ५६ हजार १२६ तर पाथरीत स्वाभिमानीला २ हजार ४०० मते मिळाली होती़ २०१९ च्या निवडणुकीतील चित्र वेगळे असणार आहे़ राज्यस्तरावर शिवसेना-भाजपाची युती होणार असल्याची चर्चा जोरदारपणे सुरू आहे़ असे झाले तर यावेळी जिंतूरमधून माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या मेघना बोर्डीकर या भाजपाकडून निवडणूक रिंगणात उतरू शकतात़ या मतदारसंघात शिवसेनेची फारशी ताकद नाही़ शिवाय खा़बंडू जाधव यांचे बोर्डीकर यांच्याशी सख्य असल्याने येथे भाजपाला शिवसेनेची मदत होईल़पाथरीत मात्र वेगळेच चित्र असेल़ येथे गेल्या वेळी अपक्ष लढलेले मोहन फड हे भाजपाचे उमेदवार असू शकतात़ फड यांनी लोकसभेला खा़ जाधव यांच्या विरोधात उघड काम केल्याने येथे राज्यात जरी शिवसेना-भाजपाची युती झाली तरी शिवसेनेचे कार्यकर्ते आ़ फड यांच्या विरोधात काम करतील़ लोकसभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाथरीत खा़ जाधव यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या प्रचार सभेला आ. फड उपस्थित राहिले आणि दुसऱ्याच दिवशी पुन्हा त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्यासाठी काम सुरू केले़ त्याचीच पुनरावृत्ती करीत खा़ जाधव हिशोब चुकता करू शकतात़ परिणामी येथे आ़ फड यांचे पाय युतीच्या दृष्टीकोणातून खोलात राहणार आहेत़ शिवाय भाजपाच्या अंतर्गत विरोधकांचाही त्यांना सामना करावा लागणार आहे़ सोनपेठ येथील एका कार्यक्रमात भाजपाचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे यांचे छायाचित्र उद्घाटन कार्यक्रमाच्या पोस्टरवर ऐनवेळी चिटकविण्यात आले होते, अशी नवीन चर्चा सुरू आता झाली आहे़ प्रत्यक्षात काय स्थिती होती, हे सोनपेठच्या भाजपा कार्यकर्त्यांनाच माहिती आहे; परंतु, हा ही आ़ फड यांच्यासाठी मायनस पॉर्इंट समजला जात आहे़गंगाखेड विधानसभा मतदार संघ यावेळी रासपकडे राहणार की भाजपकडे हे निश्चित नाही़ रत्नाकर गुट्टे हे जेलमध्ये असल्याने ही जागा भाजपाला मिळावी, यासाठी पक्षाच्या इतर नेत्यांनी आटापिटा चालविला आहे. असे झाले तर तेथेही भाजपाला सेनेचे सहकार्य मिळण्याची शक्यता कमी आहे़ शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम हेच गंगाखेडमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत़ शिवाय गेल्या निवडणुकीत येथे शिवसेनेला तब्बल ४१ हजार ९१५ मते मिळाली होती़ आता ही जागा भाजपाकडे गेल्यास शिवसैनिकांच्या नाराजीत भर पडेल़ परिणामी येथेही भाजपाला शिवसेनेचे सहकार्य मिळणे कठीण आहे़ परभणी विधानसभा मतदारसंघात अगोदरच शिवसेना-भाजपात सख्य नाही़ उलट या दोन पक्षात येथे कमालीची स्पर्धा आहे़ परिणामी शिवसेनेच्या विरोधात येथे भाजपाचा एक गट सक्रिय राहणार याची जाण आ़ डॉ़ राहुल पाटील यांना आहे़ त्यामुळे त्यांनी भाजपाच्या दुसºया गटाला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील जुन्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेवून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे़भाजपाच्या मित्र पक्षांची ओढाताण४राज्यात रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचा आठवले गट, विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष आणि महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष भाजपाचे मित्र पक्ष आहेत़ जिल्ह्यात शिवसंग्राम वगळता रिपाइं आठवले गट आणि राष्ट्रीय समाज पक्षाकडून जागांची मागणी केली जात आहे़ त्यामध्ये रिपाइं आठवले गटाने गंगाखेडची मागणी केली असून, याच जागेवर रासपचाही दावा आहे़ या मित्र पक्षांनी आपली मागणी राज्यस्तरावर लावून धरली आहे़ तरीही याबाबत भाजपाकडून भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही़४त्यामुळे आपल्या पक्षाला ही जागा मिळावी, यासाठी मित्र पक्षांची ओढाताण सुरू आहे़ रिपाइं आठवले गटाकडून डॉ़ सिद्धार्थ भालेराव यांनी उमेदवारी मागितली आहे तर रासपकडून रत्नाकर गुट्टे यांच्यासह अन्य काही नवीन उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेना