शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : श्री साईबाबांचे जन्मस्थळ ही आमची अस्मिता : ग्रामसभेत मान्यवरांचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 00:20 IST

श्री साईबाबा यांचे जन्मस्थळ ही आमची अस्मिता असून, तो तमाम साईभक्तांच्या श्रद्धेचा विषय आहे़ त्यामुळे या संदर्भात कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही़ श्री सार्इंच्या जन्मस्थळ विकास आराखड्यासाठीच निधी द्या, असा सूर मंगळवारी पाथरी येथील ग्रामसभेत उमटला़ यावेळी जिल्हाभरातील भाविक उपस्थित होते़

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी : श्री साईबाबा यांचे जन्मस्थळ ही आमची अस्मिता असून, तो तमाम साईभक्तांच्या श्रद्धेचा विषय आहे़ त्यामुळे या संदर्भात कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही़ श्री सार्इंच्या जन्मस्थळ विकास आराखड्यासाठीच निधी द्या, असा सूर मंगळवारी पाथरी येथील ग्रामसभेत उमटला़ यावेळी जिल्हाभरातील भाविक उपस्थित होते़श्री साईबाबांच्या पाथरी येथील जन्मस्थळ विकास आराखड्यास शिर्डीकरांनी विरोध दर्शविला आहे़ या अनुषंगाने सोमवारी शिर्डीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली़ त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पाथरीला तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा भाग म्हणून निधी देणार असल्याचे सांगितले़ पाथरीकरांना ही भूमिका मान्य नाही़ या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी मंगळवारी पाथरी येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते़ श्री सार्इंच्या महाआरतीनंतर झालेल्या ग्रामसभेस संस्थाचे अध्यक्ष सीताराम धानू, विश्वस्त संजय भुसारी, अ‍ॅड़ अतुल चौधरी, खा़ संजय जाधव, आ़ बाबाजानी दुर्राणी, आ़ डॉ़ राहुल पाटील, आ़ सुरेश वरपूडकर, माजी आ़ मोहन फड, माजी आ़ माणिकराव आंबेगावकर, माजी जि़प़ अध्यक्ष राजेश विटेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश ढगे, जि़प़ सभापती मीराताई टेंगसे, माजी नगराध्यक्ष मुंजाजी भाले पाटील, माजी जि़प़ उपाध्यक्षा भावनाताई नखाते, बाजार समिती सभापती अनिल नखाते, माजी जि़प़सभापती दादासाहेब टेंगसे, सुभाष कोल्हे, उपजिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे, उपनगराध्यक्ष हन्नान खान दुर्राणी, नगरसेवक राजीव पामे, माणिकआप्पा घुंबरे आदींची उपस्थिती होती़यावेळी बोलताना संस्थानचे विश्वस्त आ़ बाबाजानी दुर्राणी म्हणाले की, साई जन्मभूमी म्हणून शासनाकडे आराखडा दाखल झाला असून, त्यास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे़ एखाद्या मुद्यावरून वाद असेल तर दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेणे आवश्यक आहे़ मुख्यमंत्र्यांनी आम्हालाही चर्चेसाठी बोलवावे़ त्यानंतरच निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले़ आ़ सुरेश वरपूडकर म्हणाले की, साईबाबा जन्मस्थळाच्या विकासासाठीच आम्ही निधी मागितला आहे़ मुख्यमंत्र्यांनी तशी घोषणा केली आहे़ शिर्डीकरांकडून विरोध झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जन्मभूमीचा वाद बाजुला ठेवू, असे सांगितले आहे; परंतु, आम्ही निर्णयावर ठाम आहोत़ त्यामुळे मराठवाड्यातील सर्व आमदार, खासदारांना सोबत घेवून मुख्यमंत्र्यांपुढे बाजू मांडू, असे ते म्हणाले़ आ़ डॉ़ राहुल पाटील यांनीही पाथरी हे श्री सार्इंचे जन्मस्थळ आहे व श्री सार्इंचे जन्मस्थळ हीच आमची अस्मिता आहे़ त्यामुळे आम्ही निर्णयावर ठाम आहोत़ यावेळी बोलताना खा़ बंडू जाधव म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रातील नेते मंडळी सातत्याने मराठवाड्याविषयी आकस बाळगतात़ जायकवाडीचे पाणी देण्यावरून विरोध होतो़ आता साई जन्मभूमीवरून विरोध केला जातो़ त्यांचा विरोध अत्यंत चुकीचा आहे़ तुमच्याकडे जन्मभूमीचे पुरावे असतील तर द्या, अन्यथा आमचे पुरावे स्वीकारा़ मुख्यमंत्री आमची भूमिका ऐकून घेतल्याशिवाय निर्णय घेणार नाहीत़ त्यामुळे आम्ही त्यांच्यासमोर भूमिका मांडणार आहोत़ या संदर्भात पुरातत्व खात्याकडून माहिती घ्या़ शासन स्तरावर समिती नियुक्त करा, अशीही मागणी यावेळी त्यांनी केली़ या बैठकीत पाथरीच श्री सार्इंची जन्मभूमी आहे, असा ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला़

टॅग्स :parabhaniपरभणीsaibabaसाईबाबा