लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : तालुक्यातील ब्राह्मणगाव ते मांडाखळी या सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन १ सप्टेंबर रोजी आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले़२ कोटी ९४ लाख रुपये खर्चातून हा रस्ता तयार केला जाणार आहे़ मागील काही वर्षांपासून रस्त्याची दुरवस्था झाली होती़ या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी आ़ डॉ़ पाटील यांच्याकडे केली़त्याची दखल घेऊन आ़ डॉ़ पाटील यांनी या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून घेतला़ मजबुतीकरणाऐवजी थेट सिमेंट काँक्रीटीकरण मंजूर करून घेतले़ त्यामुळे दोन गावांतील दळणवळण सुलभ होणार आहे़ भूमिपूजन कार्यक्रमास शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, तालुकाप्रमुख नंदकिशोर आवचार, सरपंच बाबासाहेब बिधारे, उपसरपंच दत्तराव आबा, माधवराव ब्राह्मणगावकर, चेअरमन सुभाष पाटील, गजानन तुरे, संतोष काळदाते, दगडू काळदाते, ज्ञानदेव गाडगे, बालकिशन काळदाते, मोहन काळदाते, प्रकाश काळदाते, प्रकाश गाडगे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते़
परभणी : ब्राह्मणगाव ते मांडाखळी रस्ता कामाचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 23:22 IST