शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

परभणी : एटीएमच्या सुरक्षेकडे बँकांचे दुर्लक्ष कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:58 AM

प्रत्येक राष्ट्रीयकृत, खाजगी बँकांकडून शहारात एटीएमची सुविधा सुरु करण्यात आली आहे. मात्र या एटीएमसह येथे येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेकडे बँकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. शहरातील ५ बँकांचे एटीएम असून एकाही ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने भूरट्या चोरट्यांना हातचलाखी तसेच पैसे लांबविण्यासाठी संधी मिळत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): प्रत्येक राष्ट्रीयकृत, खाजगी बँकांकडून शहारात एटीएमची सुविधा सुरु करण्यात आली आहे. मात्र या एटीएमसह येथे येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेकडे बँकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. शहरातील ५ बँकांचे एटीएम असून एकाही ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने भूरट्या चोरट्यांना हातचलाखी तसेच पैसे लांबविण्यासाठी संधी मिळत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.शहरातील स्टेट बँक आॅफ इंडियाचे २ एटीएम आहेत. तर बँक आॅफ बडोदा, आयसीआयसीआय, कॅनरा, धनलक्ष्मी कॉ. बँकेचे प्रत्येकी १ एटीएम सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे बँकेत रांगेत उभे राहून पैसे काढण्यापेक्षा एटीएमवर पैसे काढण्यावर सर्व ग्राहक, नागरिक भर देत आहेत; परंतु, याच बँकांकडून त्यांनी सुरु केलेल्या एटीमची सुरक्षा करण्यासाठी साधा सुरक्षारक्षकही नेमण्याची तसदी घेतल्या जात नाही. या एटीएमची सुरक्षा रामभरोसे झाली आहे. यासर्व बाबींचा भार पोलीस प्रशासनावर पडत आहे. एटीममधून पैसे काढण्याकडे नागरिकांचा जास्त कल असल्याने दिवसभर या एटीएमवर गर्दी दिसूून येते. यामध्ये महिला, जेष्ठ नागरिक यांची संख्या लक्षणीय असते. या गर्दीत एटीएम पिन नंबर बघून कार्डाची आदलाबदल होण्याची दाट शक्यता असते. याचा फायदा भूरटे चोर घेण्याची शक्यता बळावली आहे. तसेच सुरक्षा रक्षक नसल्याने महिला व महाविद्यालयीन तरुणींनाही विविध अडचणीना तोंड द्यावे लागत आहे. छेडछाडीची घटना वाढल्याचे समोर आले आहे. यामुळे बँकांनी एटीएमसह नागरिकांच्या सुरक्षेसाठी २४ तास सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी ग्राहक, नागरिकांमधून केली जात आहे.सुरक्षेकडे कानाडोळा४मागील अनेक दिवसांपासून शहरात चोरीची प्रकरणे वाढली आहेत. दिवसा ढवळ्या आडत व्यापारी वामनराव कोक्कर यांच्या आडत दुकानावरील मुनिमानी बँकेतून काढलेले ५ लाख रुपये लांबविल्याची घटना ताजी असतानाच बँकांकडून ग्राहकांच्या सुरक्षेकडे कानाडोळा केला जात आहे.४एटीएमवर येणाºया महिला, वयोवृद्ध यांना भूरट्या चोरांकडून टार्गेट केले जाण्याची शक्यता वाढली आहे. तसेच राज्यात अनेक ठिकाणी एटीएम मशीनच चोरुन नेल्याच्या घटना वाढल्या असल्याने शहरातील बँकांनी सुरक्षारक्षकांची नियुक्ती करणे अपेक्षीत आहे.बँक प्रशासनाने लक्ष देण्याची गरजच्मानवत शहरात एकीकडे चोरीच्या घटना वाढत असताना बँक प्रशासन मात्र एटीएम केंद्रावर सुरक्षारक्षक नेमण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे नागरिकांना एटीएमवरून पैसे काढण्यासाठी धोका निर्माण झाला आहे. याकडे वरिष्ट अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.शहरातील एटीएम असणाºया बँकांना लेखीपत्र देऊन सुरक्षारक्षक नेमण्यासह सीसीटीव्हीची दुरुस्ती करून घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र अद्यापही यावर बँक प्रशासनाचा कोणताच निर्णय झाला नाही.-रमेश स्वामी, पोलीस निरीक्षक

टॅग्स :parabhaniपरभणीatmएटीएमbankबँक