शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : वाढत्या तापमानाचा केळीच्या बागांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 00:18 IST

ढत्या तापमानाने पाणीपातळीत कमालीची घट झाली असून केळी बागांवर मोठे दुष्परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. झाडे उन्मळून पडण्याच्या स्थितीत आले असून केळी उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी): वाढत्या तापमानानेपाणीपातळीत कमालीची घट झाली असून केळी बागांवर मोठे दुष्परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. झाडे उन्मळून पडण्याच्या स्थितीत आले असून केळी उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे.तालुक्यातील निळा, फुलकळस, कान्हडखेड, पूर्णा आदी भागात केळीची लागवड झाली आहे. सध्या वाढत्या तापमानामुळे केळी बागांना मोठा फटका बसत आहे. अनेक उपाययोजना करूनही उष्ण तापमानामुळे केळीचे नुकसान थांबता थांबेनासे झाले आहे. मागील आठवडाभरापासून पारा ४५ अंशाच्या वर आहे. या तापमानात कितीही पाणी दिले तरी केळीची पाने करपत आहेत. रात्रीच्या वेळी या केळीच्या बागांना पाणी देणे गरजेचे असताना विजेच्या लंपडावामुळे केळीला पाणी देणे शक्य होत नाही.पूर्णा तालुक्यातील निळा येथील शेतकरी दिगंबर सूर्यवंशी, भगवान सूर्यवंशी या शेतकऱ्यांनी ६ हजार केळीची झाडे लावली आहेत; परंतु, उन्हाच्या तीव्रतेमुळे ही झाडे अर्ध्यांतूनच उन्मळून पडत आहेत. यामुळे उत्पादन क्षमता कमी होत असून लाखो रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उष्ण वाºयापासून सरंक्षण व्हावे.जमिनीत ओलावा टिकून रहावा, यासाठी शेडनेट करावे, केळी बागांच्या चारही बाजूला गजराज गवत लावून काही प्रमाणात तरी संरक्षण होईल, यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्ला कृषी तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे; परंतु, उन्हाच्या तीव्रतेमुळे या उपाययोजनाही निष्फळ ठरत असल्याचे दिसून येत आहे.दररोज दहा घडांचे नुकसान४पूर्णा तालुक्यात दिवसेंदिवस वाढत जाणाºया तापमानामुळे बागायतदार शेतकरी हैराण झाले आहेत. एकीकडे पाणी नसल्याने उत्पादनात घट होत असतानाच दुसरीकडे मात्र वाढत्या तापमानाचा मोठा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे.४उष्ण वातावरण व हवेमुळे केळी बागेतील दररोज पाच ते दहा घड उन्मळून पडत आहेत. त्यामुळे केळी उत्पादक शेतकºयांचे दिवसाकाठी अडीच हजार रुपयांचे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीTemperatureतापमानWaterपाणीdroughtदुष्काळ