शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
2
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
3
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
4
यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
5
अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?
6
"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 
7
सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!
8
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
9
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
10
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
11
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
12
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
13
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
14
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
15
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
16
उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार
17
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
18
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
19
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
20
'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस

परभणी : गायीची मिरवणूक काढून अधिकाऱ्यांचा नोंदवला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 00:19 IST

दुधातील प्रोटीनच्या तपासणीत अधिकारी अडवणूक करीत असल्याने तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी २२ जुलै रोजी गायीची वाजत गाजत मिरवणूक काढून शासकीय दूध डेअरीतील अधिकाºयांच्या धोरणाचा निषेध नोंदविला़

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : दुधातील प्रोटीनच्या तपासणीत अधिकारी अडवणूक करीत असल्याने तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी २२ जुलै रोजी गायीची वाजत गाजत मिरवणूक काढून शासकीय दूध डेअरीतील अधिकाºयांच्या धोरणाचा निषेध नोंदविला़येथील शासकीय दूध डेअरीवर शेतकºयांनी विक्रीसाठी आणलेल्या दुधातील प्रोटीनचे प्रमाण कमी दाखवून ते दूध परत करण्याचा प्रकार मागील काही महिन्यांपासून वारंवार घडत असल्याने दूध उत्पादक शेतकरी त्रस्त झाले होते़ राज्य शासनाकडून खरेदी करण्यात येणाºया दुधाचे मागील तीन महिन्यांपासून पैसे मिळाले नसताना दुधातील प्रोटीनच्या नावाखाली दूध उत्पादकांची अडवणूक केली जात होती़ त्यातच दुष्काळी परिस्थिती आणि अधिकाºयांच्या उदासिन धोरणामुळे तालुक्यातील दूध उत्पादक आणि दूध संस्था चांगल्याच अडचणीत आल्या आहेत़दूध केंद्रावरील अधिकारी आणि कर्मचारी राबवित असलेल्या धोरणामुळे दुधाचा व्यवसाय मोडीत काढत असल्याचा आरोपही शेतकºयांमधून केला जात आहे़ प्रोटीनचे चुकीचे प्रमाण दाखवून किंवा इतर कारणांमुळे शेतकºयांनी आणलेले दूध वारंवार परत करण्याचा प्रकार तालुक्यात घडत होता़ या सर्व प्रकाराविरुद्ध २२ जुलै रोजी पाथरी येथील रणवीर भाले पाटील या शेतकºयाने दूध देणाºया गायीची वाजत गाजत मिरवणूक काढली़ बैलगाडी आणि गायी बाजार समितीच्या शासकीय दूध संकलन केंद्रावर आणल्या़ त्यानंतर केंद्रावर उपस्थित असलेल्या अधिकाºयांकडून गायीचे दूध काढण्यात आले़ प्रोटीनचे प्रमाण १७ येत असल्याने दूध नाकारणाºया अधिकाºयांना प्रत्यक्ष केंद्रावर दूध काढल्यानंतर दुधातील प्रोटीनचे प्रमाण १५ असल्याचे निदर्शनास आले़ शेतकºयांचा दबाव वाढल्याने अखेर सोमवारी अधिकाºयांनी दुधाची खरेदी केली़दूध व्यवसाय मोडीत काढण्याचा प्रकार४गायीच्या दुधामध्ये प्रोटीनचे प्रमाण १७ एवढे असेल तरच दूध खरेदी करावे, असे शासनाचे आदेश आहेत़ मात्र या भागातील गायींच्या दुधामध्ये १५ पेक्षा अधिक प्रोटीन मिळत नाही़ त्यामुळे दूध खरेदी केले जात नाही़४या प्रकारामुळे पाथरी तालुक्यात वाढलेला दूध व्यवसाय मोडीत काढण्याचा प्रयत्न शासन करीत असल्याचा आरोप दूध संस्थेचे बाभळगाव येथील विठ्ठल गिराम, पाथरगाव येथील पप्पू घांडगे यांनी केला़पथक गेले थेट शेतावऱ़़४पाथरी येथील दूध संकलन केंद्रात काढलेल्या दुधामध्ये प्रोटीनचे प्रमाण १५ एवढे आल्यानंतर मुंबई येथील के़जी़ शिंदे, ए़जी़ पठाण, केंद्रप्रमुख शेख, आऱ आऱ मुंगळे, ए़पी़ गोटे, ए़ई़ मोरे, एऩपी़ डाके आदींनी रणवीर भाले यांच्या शेतात जाऊन गायीचे दूध काढले़ त्यावेळी या दूधात प्रोटीनचे प्रमाण १४ एवढे भरले़

टॅग्स :parabhaniपरभणीmilkदूधcowगाय