शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: मनपाच्या २४ लाखांच्या प्रस्तावास दिली मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:01 IST

चालू वर्षातील टंचाई कालावधीत उपाययोजना करण्यासाठी परभणी महानगरपालिकेच्या २३ लाख ७५ हजार रुपयांच्या प्रस्तावास राज्याच्या पाणीपुरवठा विभागाने मंजुरी दिली आहे. या संदर्भातील आदेश सोमवारी काढण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : चालू वर्षातील टंचाई कालावधीत उपाययोजना करण्यासाठी परभणी महानगरपालिकेच्या २३ लाख ७५ हजार रुपयांच्या प्रस्तावास राज्याच्या पाणीपुरवठा विभागाने मंजुरी दिली आहे. या संदर्भातील आदेश सोमवारी काढण्यात आले.परभणी महानगरपालिकेने २०१८-१९ या वर्षातील पाणीटंचाई कालावधीत कामे करण्यासाठीचा प्रस्ताव औरंगाबाद विभागीय आयुक्तांकडे सादर केला होता. सदर प्रस्ताव विभागीय आयुक्तांनी राज्य शासनाकडे सादर केला. त्यामध्ये विहिरीतील गाळ काढणे, खोलीकरण आणि त्या अनुषंगिक कामे प्रस्तावित करण्यात आली होती. या प्रस्तावास राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने मंजुरी दिली आहे. ही मंजुरी देत असताना मनपासाठी काही अटी घालून देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये या प्रस्तावांच्या खर्चाच्या ९० टक्के म्हणजेच २० लाख ४७ हजार रुपयांचे अनुदान शासन देणार असून उर्वरित १० टक्के म्हणजेच २ लाख २८ हजार रुपयांची रक्कम मनपाला लोकवर्गणीतून भरावयाची आहे. ही रक्कम मनपाने विभागीय आयुक्तामार्फत खर्ची टाकल्यानंतरच पूर्ण रक्कम शासन वितरित करणार आहे. या संदर्भातील कामांची निविदा प्रक्रिया २९ मे पर्यंत पूर्ण करुन कार्यादेश देणे आवश्यक आहे. २९ मे पर्यंत याबाबतची कारवाई पूर्ण न झाल्यास योजनेची मान्यता रद्द समजण्यात येईल, असेही या संदर्भातील आदेशात नमूद केले आहे. पाणीपुरवठा योजनेची कामे १५ जूनपर्यंत पूर्ण करुन पाणीपुरवठा सुरु होणे आवश्यक असून आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी याबाबतचा प्रगती अहवाल शासनास सादर करावा, असेही या आदेशात नमूद केले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईdroughtदुष्काळ