शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

परभणी : केंद्राकडे अडकली ‘सेझ’ची रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 00:26 IST

केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत नाफेडकडून जिल्ह्यात शेतमालाची हमीभावाने खरेदी करण्यात आली. खरेदी केलेल्या या मालापोटी बाजार समित्यांना देय असलेली सेझची १.५ टक्के रक्कम अद्यापपर्यंत वितरित झाली नाही. जवळपास १ कोटी रुपयांची ही रक्कम केंद्राकडे अडकल्याने बाजार समित्या अडचणीत सापडल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत नाफेडकडून जिल्ह्यात शेतमालाची हमीभावाने खरेदी करण्यात आली. खरेदी केलेल्या या मालापोटी बाजार समित्यांना देय असलेली सेझची १.५ टक्के रक्कम अद्यापपर्यंत वितरित झाली नाही. जवळपास १ कोटी रुपयांची ही रक्कम केंद्राकडे अडकल्याने बाजार समित्या अडचणीत सापडल्या आहेत.जिल्ह्यात बाजार समितीच्या माध्यमातून शेतमालाची खरेदी केली जाते. दरवर्षी बाजार समिती अंतर्गत व्यापारी हा शेतमाल खरेदी करतात. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या हमीभावानुसार शेतमालाची खरेदी करण्यासाठी दरवर्षी जिल्ह्यामध्ये नाफेड या एजन्सीमार्फत हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले जातात. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा माल हमीभावाने खरेदी केल्यानंतर शेतकºयांना हमीभावाप्रमाणे रक्कम अदा केली जाते. त्याचबरोबर बाजार समित्यांना खरेदी केलेल्या मालाच्या तुलनेत १.०५ टक्के सेझ या एजन्सीकडून दिला जातो. चालू हंगामात जिल्ह्यात ८ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. या केंद्रावरुन तूर, हरभरा हमीभावाने खरेदी करण्यात आला. शेतकºयांकडील हे धान्य खरेदी केल्यानंतर बाजार समित्यांना देय असलेली रक्कम मात्र अद्यापपर्यंत अदा करण्यात आली नाही.चालू हंगामात फेब्रुवारी ते मे या काळात जिल्ह्यात नाफेडने हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले होते. परभणी, जिंतूर, पाथरी, मानवत, सेलू, गंगाखेड, पूर्णा आणि बोरी या ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्रावरुन शेतमालाची खरेदी करण्यात आली. ४३ कोटी ३५ लाख ३९ हजार ६०० रुपयांची तुरीची खरेदी या काळात झाली असून ५३ कोटी ३८ लाख १३ हजार २०० रुपयांची हरभºयाची खरेदी झाली आहे. दोन्ही शेतमालाची मिळून ९८ कोटी ७३ लाख १२ हजार ८०० रुपयांचा शेतमाल खरेदी करण्यात आला आहे. या पोटी १ कोटी १ लाख ५७ हजार २०४ रुपयांची सेझची रक्कम जिल्ह्यातील बाजार समित्यांना मिळणे आवश्यक आहे. मात्र या रक्कमेचे अद्यापपर्यंत वाटप झाले नाही.जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी त्या त्या बाजार समितीकडून जागा उपलब्ध करुन दिली जाते. तसेच शेतमाल खरेदीसाठी लागणारी चाळणी व एखादा कर्मचारीही हमीभाव खरेदी केंद्रासाठी दिला जातो. या बदल्यात केंद्र चालकाकडून बाजार समित्यांना खरेदीच्या १.०५ टक्के रक्कम सेझ म्हणून दिली जाते.खरेदी केंद्र बंद होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. परंतु, बाजार समित्यांना ही रक्कम अद्याप अदा करण्यात आली नाही. त्यामुळे बाजार समित्या अडचणीत सापडल्या आहेत.मागील हंगामात मिळालेली रक्कममागील २०१६-१७च्या हंगामात जिल्ह्यातील बाजार समित्यांना खरेदी केलेल्या मालापोटी सेझची रक्कम वितरित करण्यात आली होती. त्यानुसार परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत ३१ हजार ४५१ क्विंटल तुरीची खरेदी केली होती. त्यापोटी १५ लाख २७ हजार ६६३ रुपये बाजार समितीला प्राप्त झाले. जिंतूर बाजार समितीमध्ये १८ हजार १२३ क्विंटल तुरीची खरेदी झाली होती. त्यापोटी ८ लाख ८० हजार ९८ रुपये, मानवत बाजार समितीला १० लाख ६६ हजार ४८१ रुपये, गंगाखेड बाजार समितीला ६ लाख ६८ हजार ३८९ रुपये आणि सेलू येथील बाजार समितीला ६ लाख १६ हजार ९८६ रुपये प्राप्त झाले होते.हमीभावाने झालेली खरेदीकेंद्र तूर हरभरापरभणी १२१४५ ९२९५जिंतूर १६२५४ २५५२पाथरी ३८८८ १०२७३मानवत ३४५६ --गंगाखेड १२१०५ --सेलू १४४२३ ५६०१पूर्णा ९३५१ २८९३बोरी ११७५१ ४०३२

टॅग्स :parabhaniपरभणीCentral Governmentकेंद्र सरकारAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMONEYपैसा