परभणी : २११ ब्लँकेट्सचे ‘शांतीदूत’तर्फे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 12:35 AM2019-12-26T00:35:37+5:302019-12-26T00:36:46+5:30

शांतीदूत सेवाभावी संस्थेच्या वतीने शहरातील गोरगरीब नागरिकांना थंडीपासून बचाव करण्यासाठी २११ ब्लँकेट वाटप करण्यात आले आहेत़ २४ डिसेंबर रोजी हा कार्यक्रम पार पडला़

Parbhani: Allotment of 2 blankets by 'Peacekeeper' | परभणी : २११ ब्लँकेट्सचे ‘शांतीदूत’तर्फे वाटप

परभणी : २११ ब्लँकेट्सचे ‘शांतीदूत’तर्फे वाटप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शांतीदूत सेवाभावी संस्थेच्या वतीने शहरातील गोरगरीब नागरिकांना थंडीपासून बचाव करण्यासाठी २११ ब्लँकेट वाटप करण्यात आले आहेत़ २४ डिसेंबर रोजी हा कार्यक्रम पार पडला़
लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या हस्ते ब्लँकेट वाटप करण्यात आले़ अध्यक्षस्थानी शांतीदूतचे संस्थापक अध्यक्ष सुभाषचंद्र सारडा तर प्रमुख पाहुणे म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांची उपस्थिती होती़ चावरिया म्हणाले, शांतीदूतची स्थापना समाजातील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच शांतता व सलोखा राखण्यासाठी झाली होती़ मी परभणी पोलीस दलात कार्यरत असताना सुरू झालेली ही संस्था गरजूंसाठी अहोरात्र काम करीत आहे़ या संस्थेचे काम उल्लेखनीय असल्याचे ते म्हणाले़ यावेळी अंकुश पिनाटे यांनीही मार्गदर्शन केले़ यावेळी सुभाषचंद्र सारडा यांनी शांतीदूतने वर्षभरात केलेल्या कामाची माहिती दिली़ कार्यक्रमास डॉ़ दिनेश भुतडा, डॉ़ रितेश अग्रवाल, प्राचार्य सुरेश नाईकवाडे, राकेश खुराणा, गोविंद तोंडगावकर, बसंता बाहेती, वर्षा सारडा, डॉ़ सालेहा कौसर, शोभा बाहेती, पवन बाहेती आदींची उपस्थिती होती़ कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजय सारडा, विशाल बाहेती, श्याम सारडा, नेहा सारडा आदींनी प्रयत्न केले़

Web Title: Parbhani: Allotment of 2 blankets by 'Peacekeeper'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :parabhaniपरभणी