शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : बावीस दिवसांनंतर उपोषणाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 00:40 IST

कृषी आयुक्तांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर परभणीत २२ दिवसांपासून सुरू असलेले शेतकऱ्यांचे उपोषण मागे घेण्यात आले. शेतकरी संघर्ष समितीच्या मागण्यांप्रमाणे कार्यवाही केली जाईल, असे कृषी आयुक्तांचे लेखी आश्वासन बुधवारी तहसीलदारांनी संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांना दिले. त्यानंतर उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कृषी आयुक्तांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर परभणीत २२ दिवसांपासून सुरू असलेले शेतकऱ्यांचे उपोषण मागे घेण्यात आले. शेतकरी संघर्ष समितीच्या मागण्यांप्रमाणे कार्यवाही केली जाईल, असे कृषी आयुक्तांचे लेखी आश्वासन बुधवारी तहसीलदारांनी संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांना दिले. त्यानंतर उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.रिलायन्स पीक विमा कंपनीने केलेल्या मनमानी कारभारामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिल्याने २६ जूनपासून पीक विमा संघर्ष कृती समितीने बेमुदत साखळी उपोषण सुरू केले होते. या आंदोलनादरम्यान चक्का जाम, जिल्हा बंद, धरणे आंदोलनेही करण्यात आले. अखेर २२ दिवसानंतर राज्य शासनाने जिल्ह्यातील आमदार, पीक विमा संघर्ष समितीचे पदाधिकाºयांसमवेत नागपूर येथे बैठक घेतली. या बैठकीत विमा देताना कंपनीने चूक केल्याचे राज्य शासनाने कबूल केले. तसेच शेतकºयांच्या मागण्याही मान्य केल्या होत्या.दरम्यान, बुधवारी कृषी आयुक्त एस.पी. सिंह यांचे पत्र जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले. तहसीलदार विद्याचरण कडावकर यांनी हे पत्र आंदोलकांकडे सुपूर्द केले. मंत्रीमहोदयांसमवेत झालेल्या सकारात्मक चर्चेत आंदोलकांच्या मागण्या मान्य झाल्या आहेत. पीक विमा संघर्ष समितीच्या मागण्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले. त्यामुळे जवळपास १ लाख शेतकºयांना या निर्णयाचा फायदा होईल, असे सकृतदर्शनी दिसून येते़ इतर शेतकºयांनाही जोपर्यंत पीकविमा मिळणार नाही, तोपर्यंत याबाबतची मागणी कायम ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला़ त्यानंतर लेखी आश्वासनामुळे २२ दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मागे घेण्याचा निर्णय पीक विमा संघर्ष समितीने घेतला. यावेळी जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते श्रीनिवास जोगदंड, कॉ.राजन क्षीरसागर, विलास बाबर, जि.प. सदस्य डॉ.सुभाष कदम, सुभाष जावळे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा