शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : वृक्षारोपणासह संगोपनासाठी गाव घेतले दत्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:49 IST

सातत्याने निर्माण होणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी आता पर्यावरण पूरक कामांवर भर दिला जात असून या तालुक्यातील दुर्गम भागात वसलेले पार्डी हे गाव फक्त वृक्षारोपण करण्यासाठी एका सामाजिक संस्थेने दत्तक घेतले आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात या गावात हिरवळ फुलण्याची आशा निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): सातत्याने निर्माण होणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी आता पर्यावरण पूरक कामांवर भर दिला जात असून या तालुक्यातील दुर्गम भागात वसलेले पार्डी हे गाव फक्त वृक्षारोपण करण्यासाठी एका सामाजिक संस्थेने दत्तक घेतले आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात या गावात हिरवळ फुलण्याची आशा निर्माण झाली आहे.ऊसतोड मजुरांचे गाव म्हणून पार्डी या गावाची ओळख आहे. परिसरामध्ये वृक्षांची संख्या मोजकीच आहे. त्यामुळे दुष्काळाचा सर्वाधिक फटका या गावाला बसतो. याच गावात पर्यावरण पूरक कामे हाती घेण्याच्या उद्देशाने श्री तुळजाभवानी प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे. त्यातूनच हे गाव दत्तक घेतले असून गावात केवळ वृक्ष लागवड करणे एवढ्यापुरते मर्यादित न राहता किमान दोन वर्षे देखभाल करुन ही झाडे जोपासण्याचा निर्णय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.वृक्षारोपणासाठी गाव दत्तक घेतल्यानंतर सेलू शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांनी श्रमदानासाठी पुढाकार घेतला आहे. लोकसहभागातून या गावात वृक्षारोपण केले जाणाार आहे. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष छगन शेरे, तुळजाभवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद काष्टे, बचपन बचाव अभियानचे प्रमुख अ‍ॅड. कुमार महाजन, शशिकांत पाटील, सरपंच माऊली राठोड, रामेश्वर शेरे, शंकर चाकोते, उत्तम डोंबे, गजानन राऊत, राम मैफळ, रुपनर आदींनी गावाला भेट देऊन वृक्ष लागवडी संदर्भात पाहणी केली.गावातील रस्त्याच्या दुतर्फा, गायरान जमीन, स्मशानभूमी, शेतकºयांच्या बांधावर अशी साडेतीन हजारहून अधिक झाडे लावली जाणार आहेत.ही झाडे जगविण्याचा कृती आराखडा तयार केला असून माती परिक्षण करुनच योग्य त्या झाडांची लागवड केली जाणार आहे. तसेच विविध कार्यशाळेच्या माध्यमातून शेतकºयांना पीक लागवडी संदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यासाठी जालना जिल्ह्यातील खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांना पाचारण करण्यात येणार आहे, असे पदाधिकाºयांनी सांगितले.संरक्षक जाळ्या बसविणार४पार्डी गावाच्या माळरानावर लागवड केलेल्या झाडांना ठिबक सिंचनाच्या सहाय्याने पाणी देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच आवश्यक त्या ठिकाणी झाडांना संरक्षित जाळ्या बसविल्या जाणार आहेत, अशी माहिती संस्थेच्या पदाधिकाºयांनी दिली.४पावसाळ्यापूर्वी बैठक घेऊन वृक्षारोपण व इतर अनुषंगिक बाबींचे नियोजन केले जाणार आहे. यासाठी सेलू शहरातील पर्यावरण प्रेमी नागरिकांचीही मदत घेतली जाणार असल्याचे पदाधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळ