शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : रेकॉर्डवरील आरोपी तलवारीसह जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 23:55 IST

पोलिसांनी सुरू केलेल्या रात्रगस्तीमध्ये १५ आॅक्टोबर रोजी रात्री रेकॉर्डवरील एका आरोपीस तलवारीसह ताब्यात घेतले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पोलिसांनी सुरू केलेल्या रात्रगस्तीमध्ये १५ आॅक्टोबर रोजी रात्री रेकॉर्डवरील एका आरोपीस तलवारीसह ताब्यात घेतले आहे़स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने शहरात रात्र गस्त सुरू केली आहे़ शहरातील गौतमनगरातील आरोपी अमोल गायकवाड याच्या ताब्यात तलवार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ स्थागुशाचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी एक पथक तयार करून मध्यरात्री छापा टाकला़ तेव्हा अमोल गायकवाड याच्या घराची झडती घेतली असता, पलंगाखाली अडीच फुट लांबीची तलवार मिळून आली़ बेकायदेशीररित्या प्राणघातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी आरोपी गायकवाड यास ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याची परभणी येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली़ या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कापुरे यांच्या फिर्यादीवरून नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही कारवाई स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने केली़दोन वर्षांपासून फरार आरोपीस अटकपरभणी : पालम तालुक्यातील शेत शिवारातून १३ हजार रुपयांचा ऐवज चोरणाऱ्या आरोपीस दोन वर्षानंतर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ पालम येथील खंडू रामराव शेंडगे यांच्या शेत आखाड्यावर २८ जानेवारी २०१६ रोजी चोरी झाली होती़ चोरट्यांनी मंगळसूत्र, चांदीचे वाळे, मोबाईल असा १३ हजार १०० रुपयांचा ऐवज चोरून नेला़ या प्रकरणी पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता़ पोलिसांना या आरोपीची माहिती मिळाली़ त्या आधारे १६ आॅक्टोबर रोजी गेवराई तालुक्यातील तलवाडा येथून आरोपी मधुकर पंढरीनाथ पवार यास ताब्यात घेतले आहे़ त्याने गुन्हा केल्याची कबुलीही दिली आहे़ या आरोपीला पालम पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिसArrestअटक