शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : क्षमतेपेक्षा अधिकचे प्रवेश रद्द होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 00:20 IST

शहरालगतच्या ग्रामीण भागातील उच्च माध्यमिक विद्यालय/ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक देण्यात आलेले प्रवेश रद्द करण्याचे आदेश राज्याच्या शिक्षण विभागाने सर्व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले असून या संदर्भातील बाबींची तपासणी करण्यासाठी वरिष्ठ अधिकाºयांचे भरारी पथक स्थापन करण्याचेही ९ आॅगस्ट रोजी काढण्यात आलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरालगतच्या ग्रामीण भागातील उच्च माध्यमिक विद्यालय/ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक देण्यात आलेले प्रवेश रद्द करण्याचे आदेश राज्याच्या शिक्षण विभागाने सर्व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले असून या संदर्भातील बाबींची तपासणी करण्यासाठी वरिष्ठ अधिकाºयांचे भरारी पथक स्थापन करण्याचेही ९ आॅगस्ट रोजी काढण्यात आलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.शहरालगतच्या ग्रामीण भागातील उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मंजूर क्षमतेपेक्षा जादा प्रवेश होत असल्याच्या तक्रारी राज्य शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे आदेश राज्याच्या शिक्षण विभागाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात यांच्या स्वाक्षरीने ९ आॅगस्ट रोजी काढण्यात आले आहेत. त्यामध्ये महापालिका क्षेत्रातील जवळच्या ग्रामीण भागातील परिसरांमध्ये असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी प्रवेशित झाले आहेत किंवा नाही, हे तपासण्यासाठी सर्व शैक्षणिक विभागांमध्ये विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली किमान ४ भरारी पथकांची स्थापना करण्यात यावी, या भरारी पथकांमध्ये मान्यताप्राप्त व प्रतिष्ठित उच्च माध्यमिक/ कनिष्ठ महाविद्यालयातील निवडक ३ प्राचार्यांचा समावेश करावा. त्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या भरारी पथकांनी संबंधित शाळांना भेटी देऊन क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश देणाºया कनिष्ठ महाविद्यालयांची यादी शिक्षण उपसंचालकांना सादर करावी व उपसंचालकांनी ती तातडीने शिक्षण संचालकांना सादर करावी, असेही या आदेशात म्हटले आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश देणाºया कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्यास्तरावरुन अतिरिक्त विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करावेत, एखाद्या उच्च माध्यमिक विद्यालयाने क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश दिले असल्यास संबंधित विद्यालयातील जादा विद्यार्थ्यांना १२ वीच्या परीक्षेला बसता येणार नाही. त्यामुळे क्लास/ संस्थाचालकांच्या सांगण्यावरुन ज्या विद्यार्थ्यांनी अशा शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे, त्या विद्यालयांमधील प्रवेश रद्द करुन मंजूर प्रवेशित क्षमतेच्या महाविद्यालयातच प्रवेश घ्यावेत, अशा सूचनाही या आदेशात देण्यात आल्या आहेत. सर्व माध्यमिक/ कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांची ‘सरल’मधील माहिती ३० सप्टेंबरपर्यंत अपडेट करणे आवश्यक आहे. त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयांची मंजूर क्षमता, प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या आणि ‘सरल’मधील विद्यार्थ्यांची संख्या या सर्व बाबी लक्षात घेऊनच राज्य मंडळाने १२ वीच्या परीक्षेचे अर्ज स्वीकारावेत, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.दरम्यान, शिक्षण विभागाच्या या आदेशानुसार लवकरच जिल्ह्यात कारवाई होणार आहे. त्यामुळे खाजगी शिक्षण संस्था चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.बायोमेट्रिक उपस्थितीमुळेच घेतला निर्णयराज्याच्या शिक्षण विभागाने ११ वीच्या विद्यार्थ्यांची कनिष्ठ महाविद्यालयांमधील उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने नोंदविण्याचा निर्णय २५ जून रोजी घेतला होता. खाजगी कोचिंग क्लासेसचे पेव वाढल्याने शहरालगतच्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्याची औपचारिकता पूर्ण करुन अनेक विद्यार्थी कनिष्ठ महाविद्यालयात उपस्थितीच राहत नाहीत व ते थेट खाजगी शिकवण्यांमध्येच गुंतून राहतात. त्यामुळे खाजगी कोचिंग क्लासेसला आळा बसावा, या उद्देशाने राज्य शासनाने बायोमॅट्रिकचा निर्णय घेतला. आता याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर शहरांलगतच्या कनिष्ठ विद्यालयांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक दिलेले प्रवेश रद्द करण्याचा निर्णय घेऊन शिक्षण विभागाने खाजगी कोचिंग क्लासेस चालकांना एक प्रकारे इशाराच दिला असल्याचे मानले जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीSchoolशाळाStudentविद्यार्थीState Governmentराज्य सरकार