शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

परभणी : निराधारांचे ८०७ प्रस्ताव झाले मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 00:37 IST

जिंतूर तालुका निराधार योजना समितीची नुकतीच तहसीलदार सुरेश शेजूळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत जिंतूर तालुक्यातील ८०७ निराधारांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कचारठाणा (परभणी) : जिंतूर तालुका निराधार योजना समितीची नुकतीच तहसीलदार सुरेश शेजूळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत जिंतूर तालुक्यातील ८०७ निराधारांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.इंदिरा गांधी राष्टÑीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेंतर्गत ६६८, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे १३५, श्रावणबाळ राज्य निवृत्ती योजनेचे अपंग प्रवर्गातील ४ असे एकूण ८०७ लाभार्थ्यांचे अनुदान प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. शासनाच्या उपरोक्त विविध योजनेंतर्गत संंबंधित लाभार्थ्यांना दरमहा ६०० रुपये अनुदान देण्यात येत आहे. विशेष म्हणजे दारिद्रय रेषेखालील व वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेल्या लाभार्र्थ्यांची या योजनेंतर्गत निवड केली जाते. उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलच्या कर्मचाऱ्यांनी सर्व प्रस्तावांची छाननी करून योग्य प्रकरणे निकाली काढल्याचे सांगण्यात आले.निराधारांच्या अनुदानात : झाली नाही वाढइंदिरा गांधी राष्टÑीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना या योजनेसाठी मागील काही दिवसांपूर्वी सध्या मिळणाºया ६०० रुपयांच्या अनुदानात ४०० रुपये वाढ करून दरमहा हजार रुपये अनुदान देण्यात येईल, असे शासनाने जाहीर केले होते. त्याच बरोबर वृद्धापकाळ व श्रावणबाळ योजनेच्या वयाची अट ६५ वरून ६० करण्याचा निर्णय जाहीर केला होता; परंतु, आतापर्यंत त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नसल्याने संबंधित लाभार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे.तीन-तीन महिने मिळेना अनुदान४जिंतूर तालुक्यात निराधारांची मोठी संख्या आहे. त्यातच गेल्या काही दिवसांमध्ये जिंतूर व सेलू या तालुक्याच्या ठिकाणी मेळावे आयोजित करून पात्र निराधारांचे प्रस्ताव जमा करण्यात आले होते. त्यातील ८०७ प्रस्ताव मंजूर करण्यात आले असले तरी इंदिरा गांधी निवृत्ती योजना, संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेंतर्गत निराधारांना राज्य शासनाकडून तीन-तीन महिने अनुदान उपलब्ध करून दिल्या जात नाही. त्यामुळे लाभार्थ्यांची मोठी फरफट होते. त्यातच अनुदान आल्यानंतर दलालांकडून अनुदान काढूून देण्यासाठी निराधारांची लूट केल्या जात आहे. याकडे तहसील प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

 

टॅग्स :parabhaniपरभणीTahasildarतहसीलदार