शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ६३ टक्के बालकांना वाचता येतो धडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 00:18 IST

जिल्ह्यातील तिसरी ते पाचवीच्या ६३ टक्के विद्यार्थ्यांना पुस्तकातील धडा वाचता येत असल्याची बाब असर या शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या सामाजिक सेवाभावी संस्थेच्या अहवालात समोर आली आहे़ २०१८ मध्ये असरच्या वतीने देशभरात या संदर्भात सर्वेक्षण करण्यात आले होते़ त्याचा अहवाल सोमवारी जाहीर करण्यात आला़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील तिसरी ते पाचवीच्या ६३ टक्के विद्यार्थ्यांना पुस्तकातील धडा वाचता येत असल्याची बाब असर या शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या सामाजिक सेवाभावी संस्थेच्या अहवालात समोर आली आहे़ २०१८ मध्ये असरच्या वतीने देशभरात या संदर्भात सर्वेक्षण करण्यात आले होते़ त्याचा अहवाल सोमवारी जाहीर करण्यात आला़शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या असर या सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने देशभर प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची स्थिती, विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक सुविधा आदी बाबतचे सर्वेक्षण केले जाते़ असर संस्थेच्या वतीेने २०१८ मध्ये देशभर या संदर्भात सर्वेक्षण करण्यात आले़ याबाबतचा अहवाल सोमवारी संस्थेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आला आहे़ त्या अनुषंगाने परभणी जिल्ह्यातील शिक्षणाची स्थिती काय आहे? याबाबतची माहिती असर या संस्थेचे मुंबई येथील अधिकारी भालचंद्र सहारे यांच्याकडून घेतली असता, परभणी जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची स्थिती बºयापैकी असल्याची बाब समोर आली आहे़ असरच्या अहवालानुसार राज्यात ६ वर्षापर्यंत ९९़२ टक्के बालके शाळेमध्ये जातात़ तर परभणी जिल्ह्यातील ९९़८ टक्के म्हणजेच जवळपास १०० टक्के बालके शाळेत जात असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे़ राज्यातील ३७़६ टक्के मुले खाजगी शाळांमध्ये शिक्षण घेतात़ त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील २०़७ टक्के मुले खाजगी शाळांमध्ये शिक्षण घेत असल्याचे आढळून आल्याचे असरचे म्हणणे आहे़ त्यामुळे इंग्रजी शाळांचे वाढते पेव फुटले असताना पालकांचा अद्यापही जिल्हा परिषद शाळांवर विश्वास असल्याचे या माध्यमातून अधोरेखित झाले आहे़ तिसरी ते पाचवी या वर्गापर्यंतच्या जिल्ह्यातील ६३ टक्के विद्यार्थ्यांना पुस्तकातील धडे वाचता येतात़ महाराष्ट्रात मात्र ५५़५ टक्के बालकांना धडे वाचता येतात, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे़ तिसरी ते पाचवीपर्यंतच्या जिल्ह्यातील ४९़५ टक्के विद्यार्थ्यांना वजाबाकी व भागाकार येतो तर हेच प्रमाण राज्यात ४४़८ टक्के आहे़ यामध्ये राज्यात रत्नागिरी जिल्हा प्रथम असून, सातारा जिल्हा द्वितीय तर पुणे जिल्हा तृतीय क्रमांकावर आहे़ परभणी जिल्ह्याची याबाबतीत पिछेहट असल्याचे समोर आले आहे़राज्यात परभणी जिल्हा चौथ्या क्रमांकावरसहावी ते आठवी वर्गातील जिल्ह्यातील ८८़५ टक्के विद्यार्थ्यांना पुस्तकातील धडा वाचता येतो़ राज्यात हे प्रमाण ७७़५ टक्के आहे़ याबाबीमध्ये परभणी जिल्हा राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे़ पहिल्या क्रमांकावर पुणे, दुसºया क्रमांकावर रत्नागिरी तर तिसºया क्रमांकावर सिंधूदुर्ग जिल्हा आहे़ सहावी ते आठवीमधील जिल्ह्यातील ४०़३ टक्के विद्यार्थ्यांना वजाबाकी व भागाकार येतो़ राज्यामध्ये हे प्रमाण ३८़३ टक्के आहे़ यात सिंधूदुर्ग जिल्हा प्रथम, रत्नागिरी द्वितीय तर पुणे जिल्हा तृतीय क्रमांकावर आहे़ याबाबीत मात्र परभणी जिल्हा पिछाडलेला दिसून येत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीSchoolशाळाStudentविद्यार्थी