शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी :गोदावरीतून दररोज ५० ब्रास वाळू लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 00:33 IST

तालुक्यातील गौंडगाव परिसरातील गोदावरी नदीपात्रातून दररोज रात्रीच्या वेळी ५० ब्रास वाळू चोरी होत असल्याचा प्रकार गेल्या दीड महिन्यापासून सुरू असून, या प्रकरणी महसूल विभागाकडून कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : तालुक्यातील गौंडगाव परिसरातील गोदावरी नदीपात्रातून दररोज रात्रीच्या वेळी ५० ब्रास वाळू चोरी होत असल्याचा प्रकार गेल्या दीड महिन्यापासून सुरू असून, या प्रकरणी महसूल विभागाकडून कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे़गंगाखेड तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रात झोला, पिंपरी झोला, मसला, खळी, गौंडगाव, चिंचटाकळी, मैराळ सावंगी, दुस्सलगाव, भांबरवाडी, महातपुरी, आनंदवाडी, धारखेड, नागठाणा व मुळी आदी गोदावरी नदीपात्राजवळील गावात वाळू उपसासाठीचे वाळूचे घाट आहेत.आजघडीला तालुक्यातील वरील एकाही वाळू घाटाचा महसूल प्रशासनाकडून लिलाव झालेला नाही. असे असताना सुद्धा गौंडगाव परिसरातील वाळू घाटावरून दररोज रात्री ट्रॅक्टरद्वारे ५० ब्रॉस वाळूचा राजरोसपणे उपसा केला जात आहे. त्यानंतर गोदावरी नदीपात्रातील उपसा केलेली वाळू ट्रॅक्टरच्या माध्यमातून पात्राबाहेर असलेल्या चिंचटाकळी रस्त्याच्या बाजूला साठा करून ठेवली जात आहे. या साठ्यातून हायवा, टिप्पर, ट्रॅक्टर आदी वाहने भरून त्याची विनापरवाना अवैधरित्या वाहतूक केल्या जाते.गौंडगाव येथील वाळू धक्याचा लिलाव झाला नसताना वाळू उपसा केला जात असल्याने गावातील काही ग्रामस्थांनी या अवैध वाळू उपशाला तीव्र विरोध केला. मात्र वाळूमाफियांकडून ग्रामस्थांना धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे वाळू घाटांचा लिलाव झाला नसतानाही दरदिवशी रात्रीच्या वेळी साडेतीन लाख रुपयांच्या वाळूचा राजरोसपणे विनापरवाना उपसा होत असताना महसूल प्रशासनातील तलाठी, मंडळ अधिकारी व तहसीलदार दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.रात्रीच्या वाळू उपशाने होतेय झोपमोडगोदावरी नदीपात्रातून विनापरवाना वाळू उपसा करण्यासाठी रात्रभर ट्रॅक्टर, जेसीबी आदी वाहने चालू असल्याने या वाहनांच्या आवाजाचा मोठा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. त्याच बरोबर वाळूची चोरटी वाहतूक करणारी वाहने ही भरधाव वेगात धावत असल्याने रस्त्याने चालताना सुद्धा भीती वाटत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. विशेष म्हणजे रस्त्याच्या बाजूला केलेले वाळू साठे संबधित गावाचे तलाठी, मंडळ अधिकारी व तहसील कार्यालयातील अधिकाºयांच्या निदर्शनास कसे काय, येत नाहीत, अशी प्रतिक्रिया गौंडगाव येथील एका ग्रामस्थाने दिली.पर्यावरणास धोकागौंडगाव परिसरातून राजरोसपणे होणाºया वाळू उपशामुळे गोदावरी नदीपात्रातील पाणीपातळी खालावत आहे. त्यामुळे पर्यावरणास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील नदीपात्रातून विना परवाना होणाºया वाळू उपशाकडे नूतन तहसीलदार स्वरुप कंकाळ हे लक्ष देऊन अनाधिकृत वाळू उपसा करणाºया वाळू माफियांना रोखतील का? असा सवाल ग्रामस्थांमधूून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळूgodavariगोदावरी