शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : साडेसात कोटींचा निधी अखर्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 23:56 IST

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या निधीपैकी ७ कोटी ५७ लाख रुपयांचा २०१७-१८ या आर्थिक वर्षातील निधी अखर्चित राहिला असून या संदर्भात अधिकाऱ्यांकडून नियोजन झाले नसल्याने काही सदस्यांनी सोमवारी या संदर्भात नाराजी व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या निधीपैकी ७ कोटी ५७ लाख रुपयांचा २०१७-१८ या आर्थिक वर्षातील निधी अखर्चित राहिला असून या संदर्भात अधिकाऱ्यांकडून नियोजन झाले नसल्याने काही सदस्यांनी सोमवारी या संदर्भात नाराजी व्यक्त केली.राज्य शासनाने दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेला २०१७-१८ या आर्थिक वर्षात जवळपास २५ कोटी रुपयांचा निधी ग्रामीण भागातील दलित वस्त्यांमध्ये विकासकामे करण्यासाठी मंजूर केला होता. त्यानंतर राज्य शासनाने जाहीर केलेल्या शेतकºयांच्या कर्जमाफीमुळे निर्माण झालेली वित्तीय तूट भरुन काढण्यासाठी प्रत्येक विभागाच्या ३० टक्के निधी कपातीचे आदेश जानेवारी २०१८ मध्ये काढण्यात आले होते. त्याअंतर्गत जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या निधीपैकी ३० टक्के म्हणजेच ७ कोटी ५७ लाख रुपयांचा निधी कपात करण्यात आला होता. राज्य शासनाच्या निधी कपातीच्या निर्णयावर सर्वत्र चौफेर टीका झाली व विकासकामांवर त्याचा परिणाम होत असल्याचे पाहून शासनाने फेब्रवारी २०१८ मध्ये हा निर्णय मागे घेतला. त्यानुसार कपात केलेला ७ कोटी ५७ लाख रुपयांचा निधी पुन्हा समाजकल्याण विभागाला राज्य शासनाने परत केला. हा निधी दोन वर्षात खर्च करायचा असला तरी दरवर्षी शासन दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करुन देत असल्याने तो ३१ मार्च २०१८ पर्यंत खर्च करणे आवश्यक होते; परंतु, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने या संदर्भात कारवाई केली नाही. परिणामी ७ कोटी ५७ लाख रुपयांचा निधी गेल्या आर्थिक वर्षात अखर्चित राहिला. या संदर्भात जिल्हा परिषदेच्या काही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. त्या अनुषंगाने सोमवारी काही सदस्यांनी जि.प.सीईओ बी.पी.पृथ्वीराज यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर गाºहाणे मांडले. त्यानंतर पृथ्वीराज यांनी सदरील निधी खर्चाचे तातडीने नियोजन करावे, असे आदेश समाजकल्याण अधिकारी श्रीमती भोजने यांना दिले. त्यामुळे आता येत्या ८ दिवसांत या निधी खर्चाचे नियोजन करून वितरण विविध दलितवस्त्यांना होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीfundsनिधीzpजिल्हा परिषद