शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पाथरी तालुक्यात पोलिसांनी पकडली ४४ हजारांची देशी दारू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 00:22 IST

पोलीस दलातील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने १० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास पाथरी तालुक्यातील लिंबा रस्त्यावर एका चारचाकी गाडीत ४४ हजार ९२८ रुपयांची देशी दारू पकडली आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पोलीस दलातील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने १० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास पाथरी तालुक्यातील लिंबा रस्त्यावर एका चारचाकी गाडीत ४४ हजार ९२८ रुपयांची देशी दारू पकडली आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. या अंतर्गत एम.एच.२२/यु ३०० या पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून नेत दारू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लिंबा रोडवरील कॅनॉलजवळ ही गाडी थांबवून तपासणी केली असता भिंगरी संत्रा दारूचे १८ बॉक्स गाडीत आढळले. या बॉक्समध्ये दारूच्या ८६४ बाटल्या होत्या. ४४ हजार ९२८ रुपयांची दारू आणि ४ लाख रुपये किंमतीची चारचाकी गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. आरोपी भारत विक्रम गायकवाड याने ही दारू परळी येथील अमर वाईन शॉपचे पिराजी देशमुख यांच्याकडून घेऊन ती लिंबा परिसरात चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन येत होता. या प्रकरणी भारत गायकवाड (गंगासागरनगर, परळी जि.बीड), चालक अंकुश ज्ञानोबा आंधळे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच या दोघांसह गाडी मालक गणेश राठोड (रा.इंदूकवाडी, ता. परळी) आणि पिराजी देशमुख या चौघांविरुद्ध पाथरी पोलीस ठाण्यात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रकाश कापुरे, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, जमीर फारुखी, शंकर गायकवाड, अरुण कांबळे, ज्योती चौरे, आशा सावंत, भगवान सुतारे, हुसेन खान, विशाल वाघमारे यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :parabhaniपरभणीliquor banदारूबंदीPoliceपोलिस