शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

परभणी : प्रधानमंत्री आवास योजनेत १४७ घरकुले पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 12:12 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पित सर्वांसाठी घरे या घोषणे अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेत जिल्ह्यातील ८ तालुक्यांच्या ठिकाणी केवळ १४७ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे़ उद्दिष्टाच्या तुलनेत ४ टक्के घरे बांधून तयार झाली असून, २०२० पर्यंत प्रशासनाला ३ हजार ६४२ घरे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पित सर्वांसाठी घरे या घोषणे अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेत जिल्ह्यातील ८ तालुक्यांच्या ठिकाणी केवळ १४७ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे़ उद्दिष्टाच्या तुलनेत ४ टक्के घरे बांधून तयार झाली असून, २०२० पर्यंत प्रशासनाला ३ हजार ६४२ घरे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़देशातील सर्व नागरिकांना २०२२ पर्यंत हक्काचे घरकुल देण्याची घोषणा केंद्र शासनाने केली आहे़ या घोषणेंतर्गत परभणी जिल्ह्यात २०२२ पर्यंत १० हजार ३८३ घरकुले केवळ नागरी भागात बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे़ तर २०२० अखेर ३ हजार ६४२ घरकुलांचे बांधकाम करावयाचे आहे़या योजनेंतर्गत गोरगरीब कुटुंबियांना त्यांचे हक्काचे घरकुल मिळावे, या उद्देशाने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे़ परभणी जिल्ह्यातील महानगरपालिका वगळता एक नगर पंचायत आणि ७ नगरपालिकांमध्ये घरकूल बांधकामांचे लाभार्थी निवडण्यात आले आहेत़ या आठही संस्थांमध्ये घरकुल बांधकामांना सुरुवात झाली असली तरी प्रत्यक्षात घरकुलांच्या उभारणीची गती मात्र संथ आहे़ त्यामुळे उद्दिष्ट गाठण्यासाठी नगरपालिका व नगर पंचायत प्रशासनाला प्राधान्याने घरकुलांच्या प्रश्नावर काम करावे लागणार आहे़पाथरी, गंगाखेड, सेलू, मानवत, सोनपेठ, पूर्णा आणि जिंतूर या सात नगरपालिका तसेच पालम नगरपंचायतीमध्ये प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या कामाला प्रारंभ झाला आहे़ २०२२ पर्यंत १० हजार ३८३ घरकुल उभारणीचे उद्दिष्ट समोर ठेवून काम सुरू करण्यात आले असून, ८ हजार ९२९ घरकुलांचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे़ त्यापैकी ५ हजार ७७७ लाभार्थ्यांना प्रत्यक्ष घरकुल बांधण्याची परवानगी देण्यात आली आहे़ मात्र आतापर्यंत केवळ १४७ घरकुलेच बांधून तयार झाली असून, उर्वरित ३ हजार ४९५ घरकुलांचे बांधकाम करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाला प्राधान्य क्रमाने ही कामे हाती घ्यावी लागणार आहेत़प्रशासनाने लाभार्थी निवडून त्यांना घरकूल बांधकामाची परवानगी दिली असली तरी प्रत्यक्षात घरकुुले उभारणीचे काम संथगतीने असल्याने या लाभार्थ्यांच्या अडचणी काय आहेत? हे समजून घ्यावे लागणार आहे़ त्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासनानेच एक पाऊल पुढे टाकले तर हे उद्दिष्टही पूर्ण होऊ शकते़ प्रशासनाकडे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे़या काळामध्ये रखडलेली घरकुले पूर्ण करून घेतल्यास शहरी भागात राहणाºया सर्वसामान्य नागरिकांचे हक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण होऊ शकते़वाळूची मोठी समस्या४घरकुलांचे बांधकाम करीत असताना लाभार्थ्यांना वाळूचा मोठा अडसर निर्माण झाला आहे़ या लाभार्थ्यांना दिल्या जाणाºया अनुदानामध्ये घरकुल बांधून पूर्ण होणे शक्य नाही़४कारण वाळूचे भाव गगनाला भिडले आहेत़ तसेच वर्षभरापासून खुल्या बाजारपेठेमध्ये वाळू उपलब्ध नाही़४२० ते २५ हजार रुपये ट्रक या दराने वाळू खरेदी करणे शक्य नसल्याने अनेक बांधकामे रखडली आहेत़ निवडलेल्या लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे़पूर्ण झालेले घरकुल४प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ४ शहरामध्ये घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे़ त्यात गंगाखेड नगरपालिकेने १ हजार ७३ घरकुल बांधकामाचा डीपीआर तयार केला असून, ४५६ जणांना बांधकाम परवानगी दिली आहे़ त्यापैकी ६७ जणांनी घरकुल बांधून पूर्ण केले आहे़ सेलू नगरपालिकेने १ हजार १८३ जणांना घरकुल बांधकामाची परवानगी दिली असून, ५ जणांचे घरकुल बांधून पूर्ण झाले आहे़ पालम नगरपंचायतीने ३०० लाभार्थ्यांना बांधकाम परवानगी दिली आहे़ त्यापैकी केवळ तिघांचे घरकुल बांधकाम पूर्ण झाले आहे़ तर जिंतूर नगरपालिकेने १ हजार ५२ जणांना घरकुल बांधकामाची परवानगी देण्यात आली असून, ७२ जणांनी घरकुलांचे बांधकाम पूर्ण केले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीprime ministerपंतप्रधानHomeघर