शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ३८ दिवसांत पेट्रोल ८.२६ रुपयांनी घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 00:05 IST

देशात सर्वाधिक किंमतीमध्ये इंधन खरेदीचा परभणीकरांचा उच्चांक कायम असला तरी गेल्या ३८ दिवसांमध्ये तब्बल ८ रुपये २६ पैसे प्रति लिटर पेट्रोलच्या किंमतीमध्ये कपात झाल्याने जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : देशात सर्वाधिक किंमतीमध्ये इंधन खरेदीचा परभणीकरांचा उच्चांक कायम असला तरी गेल्या ३८ दिवसांमध्ये तब्बल ८ रुपये २६ पैसे प्रति लिटर पेट्रोलच्या किंमतीमध्ये कपात झाल्याने जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे.मनमाड येथील तेल डेपोपासून इंधनाची वाहतूक करण्यास अधिक भाडे लागत असल्याच्या कारणावरुन इतर शहरांच्या तुलनेत देशात सर्वाधिक महाग पेट्रोल परभणीमध्ये मिळत आहे. सप्टेंबर व आॅक्टोबर या दोन महिन्यांमध्ये पेट्रोल दरवाढ सातत्याने होत असल्याने सर्वाधिक रक्कम देऊन पेट्रोल खरेदी केले जात असल्याची जाणीव परभणीकरांना झाली. त्यानंतर देशपातळीवर परभणीचे नाव पोहचले. आजही परभणीकर सर्वाधिक दरानेच पेट्रोल खरेदी करीत आहेत. असे असले तरी आंतराष्ट्रीय पातळीवर गेल्या २२ दिवसांपासून इंधनाच्या दरामध्ये घसरण होत असल्याने देशातील इंधन दरामध्ये सातत्याने कपात होत आहे. परिणामी परभणीतही इंधनाचे दर कमी झाले आहेत. परभणीत ४ आॅक्टोबर रोजी सर्वाधिक म्हणजे तब्बल ९३.३७ पैसे प्रति लिटर दराने परभणीकरांना पेट्रोल तर ८०.८२ पैसे प्रति लिटर दराने डिझेल खरेदी करावे लागले.१२ नोव्हेंबर रोजी मात्र आॅक्टोबरच्या तुलनेत तब्बल ८ रुपये २६ पैसे कमी दराने म्हणजेच ८५ रुपये ११ पैसे प्रति लिटर पेट्रोल मिळाले. तर डिझेल ४ रुपये २८ पैसे कमी दराने म्हणजेच ७६ रुपये ५४ पैसे कमी दराने मिळाले.४ ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत पेट्रोलच्या दरात ८ रुपये ४० पैसे प्रति लिटर दराने कपात झाली. तर १ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत १ रुपया ४८ पैसे प्रति लिटर दराने कपात झाली. डिझेलमध्येही ४ ते ३१ आॅक्टोबर कालावधीत प्रति लिटर ३ रुपये ६ पैसे घट झाली. तर १ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत ४ रुपये २८ पैसे प्रति लिटर दराने कपात झाली. आंतराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडीचा पेट्रोल, डिझेल किंमतीवर परिणाम होत असला तरी इंधन दरवाढीमुळे केलेली भाडेवाढ मात्र वाहतूकदार व प्रवासी वाहनमालकांनी कमी केलेली नाही. उलट काहींनी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अधिकची भाडेवाढ केली आहे. याचा सर्वसामान्यांना फटका बसत असताना याकडे गांभीर्याने पाहण्यास कोणीही तयार नाही. परिणामी सर्वसामान्य नागरिकांना इंधन दर कपात होऊनही महागाईचा फटका सहन करावा लागत आहे.कच्च्या तेलात २० टक्के घसरण; पण दर मात्र ७ टक्केच कपातआंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात जवळपास २० टक्के घसरण झाली आहे. त्यामुळेच इंधनाचे दर कमी होत असल्याचे समजते. ३ आॅक्टोबर रोजी आंतराष्ट्रीयस्तरावर ब्रेंट क्रुड ८४.७४ डॉलर प्रति बॅरेल होते, ते ९ नोव्हेंबर रोजी ६९.७० डॉलर प्रति बॅरल झाले. डब्ल्यूटीआय क्रुड देखील २० टक्क्यांनी कमी होऊन ६५.६० डॉलर प्रति बॅरल झाले. कच्च्या तेलात जवळपास २० टक्के कपात होत असताना तेल कंपन्यांकडून मात्र नागरिकांना त्याचा पुरेपुर लाभ होऊ दिला जात नसल्याचे स्पष्ट होत आहे. कच्च्या तेलाचे दर २० टक्क्याने कमी झाले असताना इंधनाचे दर मात्र फक्त ७ टक्क्यांनी कमी केले जात आहेत. परिणामी तेल कंपन्यांचा ग्राहकांच्या खिशावर डल्ला मारणे सुरुच आहे.एकीकडे इंधन दरवाढीने सर्वसामान्य नागरिक हैराण असताना नागरिकांना मिळणारे इंधन अचूक व शुद्ध आहे की नाही, याची पडताळणी करणारी सक्षम यंत्रणाच जिल्हापातळीवर कार्यरत नाही. परभणीत इंधनात भेसळ होत असल्याच्या तक्रारी सातत्याने जिल्हा पुरवठा विभागाकडे करण्यात आल्या होत्या; परंतु, या तक्रारीवर पुरवठा विभागाने कोणतीही कारवाई केलेली नाही. नियमितपणे जिल्ह्यातील पेट्रोलपंपाची तपासणी होत नाही. शिवाय ग्राहकांनी दिलेल्या पेट्रोलच्या नमुन्यांच्या तपासणीचा अहवाल महिनोमहिने मिळत नाही. परिणामी सर्वच बाजुंनी ग्राहकांची कोंडी होत असताना तेल कंपन्यांचे अधिकारी आणि पुरवठा विभागाचे अधिकारी मूग गिळून गप्प आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीFuel Hikeइंधन दरवाढPetrolपेट्रोलDieselडिझेल