शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

परभणी : गंगाखेड तालुक्यात सहा महिन्यात २६ जण बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 00:06 IST

जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत शहर व तालुक्यातून २६ जण आपल्या सहा बालकांसोबत बेपत्ता झाल्याची नोंद गंगाखेड पोलीस ठाण्यात झाली आहे. यातील १३ जणांचा व त्यांच्या सोबत असलेल्या बालकांचा शोध लागला असला तरी उर्वरित १३ जण व ३ लहान मुले अद्यापही बेपत्ता असल्याने पोलीस अधिकारी त्यांचा शोध घेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत शहर व तालुक्यातून २६ जण आपल्या सहा बालकांसोबत बेपत्ता झाल्याची नोंद गंगाखेड पोलीस ठाण्यात झाली आहे. यातील १३ जणांचा व त्यांच्या सोबत असलेल्या बालकांचा शोध लागला असला तरी उर्वरित १३ जण व ३ लहान मुले अद्यापही बेपत्ता असल्याने पोलीस अधिकारी त्यांचा शोध घेत आहेत.गंगाखेड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या शहर तसेच ग्रामीण भागातील वेगवेळ्या गावातून गत वर्षभरात २५ जण बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी यातील २३ जणांचा शोध लावला. त्यामध्ये तालुक्यातील नरळद येथून १ मे २०१८ रोजी बेपत्ता झालेली ३० वर्षीय महिला व ७ जुलै २०१८ रोजी शहरातील लहुजीनगर येथून बेपत्ता झालेली २६ वर्षीय या दोन महिला अद्यापही पोलिसांंना मिळून आल्या नाहीत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.गेल्या वर्षभरात हरवलेल्या व्यक्तींची संख्या चालू वर्षात सहा महिन्यांच्या कालावधीत यामध्ये दुप्पट वाढ झाली आहे. ११ जानेवारी २०१९ ते १ जुलै २०१९ या सहा महिन्यांच्या कालावधीत एकूण १२ पुरुष, ११ महिला व ३ तरूणी असे एकूण २५ जण ६ बालकांसोबत बेपत्ता झाल्याची नोंद गंगाखेड पोलीस ठाण्यात आहे. त्यातच जुलै महिन्याच्या १ तारखेला शहरातील वकील कॉलनी परिसरातून १८ वर्षीय तरूणी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या मोठ्या बहिणीने दिल्यानंतर हरवल्याची नोंद गंगाखेड पोलीस ठाण्यात करण्यात आली. नोंद झाल्यानंतर दुसºयाच दिवशी ही तरुणी २ जुलै रोजी मिळून आली. सहा महिन्याच्या कालावधीत २५ जण हरवल्याची नोंद पोलीस डायरीत झाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात ६ पुरुष, ५ महिला, २ तरुणी व त्यांच्या सोबत असलेल्या ३ बालकांचा शोध लागला आहे. उर्वरित १३ जण व ३ बालकांचा शोध सुरू असल्याचे सपोनि भोगाजी चोरमले यांनी सांगितले.हे आहेत अजूनही बेपत्ताचच्२९ जानेवारी २०१९ रोजी शहरातील ममता कॉलनी परिसरातून बेपत्ता झालेल्या नबी खान रहेमतुल्ला खान पठाण (वय ३५), सोनपेठ तालुक्यातील वडगाव स्टेशन येथून २७ मार्च २०१९ रोजी सुवर्णमाला विष्णू होरे (वय ३०), गंगाखेड शहरातून ७ मे २०१९ रोजी अश्विनी महादेव चाटे (वय २०,रा. भेंडेवाडी), ४ मे २०१९ रोजी बेपत्ता झालेली तरूणी क्रांती उर्फ मोनिका नारायण वंजारे (वय १९ , रा. मन्नाथ नगर, गंगाखेड), गंगाखेड शहरातील रोशन मोहल्ला येथून १४ मे २०१९ रोजी बेपत्ता झालेला तरूण सय्यद रहीम सय्यद खलील (वय २०), तालुक्यातील डोंगरगाव येथून १५ मे २०१९ रोजी सत्यभामा बळीराम चंदे (वय ४०), २५ मे २०१९ रोजी गंगाखेड शहरातून बेपत्ता झालेली नवविवाहिता अनुराधा नामदेव सुरवसे (वय १९, रा. मसनेरवाडी), माखणी येथून १७ मे २०१९ रोजी बेपत्ता झालेला तरूण विकास राजाराम भालेराव (वय २५), २५ सप्टेंबर २०१८ रोजी तालुक्यातील कौडगाव येथून बेपत्ता झालेले विष्णू भगवान मुंडे (वय ३५), १६ मार्च २०१९ रोजी बेपत्ता झालेले गोविंद रावसाहेब मुंडे (वय ३०, रा. ढवळकेवाडी), २३ मे २०१९ पासून लहान मुलीसह बेपत्ता झालेल्या भाग्यश्री दिगंबर चव्हाण (वय ३०), कोद्री येथून २१ जून २०१९ रोजी ६ वर्षी मुलगी व ५ वर्षीय लहान मुलासोबत बेपत्ता असलेल्या अनुराधा मोकिंंद सावंत (वय ३०) यांचा समावेश असून त्यांचा आजपर्यंत शोध लागला नाही, असे पोलीस डायरीत असलेल्या नोंदीवरून समोर आले आहे. बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या शोधार्थ पोलिसांनी विशेष मोहीम राबविणे आवश्यक असल्याचे बेपत्ता व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्यातून बोलल्या जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी