शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
4
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
5
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
6
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
7
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
8
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
9
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
10
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
11
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
12
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
13
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
14
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
15
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
16
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
17
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
18
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
19
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
20
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!

परभणी : रिलायन्स जिओला २६ कोटींचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 00:19 IST

जिल्ह्यात आॅप्टीकल फायबर नेटवर्कचे वायर टाकण्यासाठी महसूल विभागाची पूर्व परवानगी घेतली नसल्याच्या कारणावरुन रिलायन्स जिओ कंपनीला जिल्हाधिकारी पी.शिव शंकर यांनी २६ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. आ.बाबाजानी दुर्राणी यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: जिल्ह्यात आॅप्टीकल फायबर नेटवर्कचे वायर टाकण्यासाठी महसूल विभागाची पूर्व परवानगी घेतली नसल्याच्या कारणावरुन रिलायन्स जिओ कंपनीला जिल्हाधिकारी पी.शिव शंकर यांनी २६ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. आ.बाबाजानी दुर्राणी यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.परभणी जिल्ह्यात रिलायन्स जिओ कंपनीच्या वतीने ठिकठिकाणी आॅप्टीकल फायबर नेटवर्कचे वायर टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले होते. या खोदकामास महसूल जमीन अधिनियम १९६६ चे कलम ४९ (७ व ८) प्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक असताना रिलायन्स जिओ कंपनीने अशी कोणतीही औपचारिकता पूर्ण केली नाही. तसेच महसूल, बांधकाम, जिल्हा परिषद, पाटबंधारे, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आदी विभागांच्या कार्यक्षेत्रांमध्ये काही अधिकाºयांना हाताशी धरुन रॉयल्टी न भरताच खोदकाम केले. या संदर्भात शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे रिलायन्स जिओ कंपनीवर तसेच या कंपनीला सवलत देणाºया अधिकाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी आ.बाबाजानी दुर्राणी यांनी विधानपरिषदेत काही महिन्यांपूर्वी तारांकित प्रश्न उपस्थित करुन केली होती. या विषयावर त्यावेळी सभागृहात दीर्घ चर्चा झाली. त्यानंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश परभणी जिल्हाधिकाºयांना दिले होते. त्यानंतर जिल्हाधिकाºयांनी या प्रकरणी परभणीच्या उपविभागीय अधिकारी सूचिता शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली होती. या चौकशी समितीने १ मार्च २०१८ रोजी जिल्हाधिकाºयांकडे अहवाल सादर केला. त्या अहवालामध्ये रिलायन्स जिओ कंपनीने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४९ नुसार जिल्हाधिकाºयांची परवानगी घेतलेली नाही. तसेच रिलायन्स जिओ कंपनीला चौकशीसाठी वेळोवेळी लेखी सूचना देऊनही कंपनीने प्रतिसाद दिला नाही. तसेच या कंपनीने खोदकामासाठी परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कंपनीला खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले होते; परंतु, कंपनीने असा कोणताही खुलासा जिल्हाधिकाºयांकडे सादर केला नाही. त्यामुळे रिलायन्स जिओ कंपनीला विविध ४२ ठिकाणी परवानगी न घेता खोदकाम केल्या प्रकरणी २५ कोटी ९५ लाख ६३ हजार ७५० रुपयांचा दंड जिल्हाधिकाºयांनी ठोठावला आहे. या संदर्भातील आदेश जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी ७ आॅगस्ट रोजी दिले आहेत. याबाबतची माहिती आ.बाबाजानी दुर्राणी यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली. रिलायन्स जिओ कंपनीला काही अधिकाºयांनी सहकार्य केले. त्यामुळेच या कंपनीने शासनाची पूर्वपरवानगी न घेताच अनधिकृतरित्या खोदकाम करुन कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविला आहे. त्यामुळे किरकोळ कारणास्तव इतरांना लाखो रुपयांचा दंड आकारणाºया महसूलच्या अधिकाºयांनी रिलायन्स जिओला सवलत कशी दिली, याचीही चौकशी झाली पाहिजे, असेही आ.दुर्राणी म्हणाले.जिल्हाभरातच रिलायन्स जिओचे खोदकामजिल्हाधिकाºयांनी फक्त ४२ ठिकाणी केलेल्या खोदकाम प्रकरणातच रिलायन्स जिओला दंड ठोठावला आहे. प्रत्यक्षात संपूर्ण जिल्ह्यात रिलायन्स जिओकडून खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे प्रारंभीच्या ४२ ठिकाणांसाठी रिलायन्स जिओकडून परवानगी घेण्यात आली नसेल तर इतर ठिकाणच्या खोदकामासाठी तरी परवानगी कशी काय? घेण्यात आली असेल, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे रिलायन्स व्यतिरिक्त इतर टेलिफोन कंपन्यांनी जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात फायबर आॅप्टीकल केबलसाठी खोदकाम केले आहे. त्यामध्ये बहुतांश ठिकाणी महसूल विभागाची किंवा अन्य कोणत्याही विभागाची परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे याबाबींचीही आता महसूल विभागाकडून चौकशी होईल का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.४२ ठिकाणी केले अवैध खोदकामजिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी रिलायन्स जिओ कंपनीला ठोठावलेल्या दंडाच्या आदेशात या कंपनीने जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, परभणी महानगरपालिका, नगरपालिका प्रशासन विभाग, एमआयडीसी आदी विभागाच्या अख्त्यारित ४२ ठिकाणी खोदकाम केल्याचे नमूद केले आहे. या ४२ ठिकाणांच्या प्रकरणातच जवळपास २६ कोटींचा दंड रिलायन्स जिओला ठोठावण्यात आला आहे. या दंडामध्ये खोदकामाचे परिमाण, खोदकामाची लांबी, रुंदी, खोली, खोदकाम करण्यात आलेल्या मुरुमचा बाजारभाव व पाचपट दंडाची रक्कम यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीcollectorजिल्हाधिकारीReliance Jioरिलायन्स जिओ