शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

परभणी : जिल्ह्यात २० टक्के पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:18 IST

कृषी विभागाने २०१८-१९ च्या रबी हंगामाच्या पेरणीसाठी २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे़; परंतु, जिल्ह्यात परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने आतापर्यंत केवळ ५६ हजार २४३ हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. या पेरणीची टक्केवारी केवळ २०.२८ टक्केच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कृषी विभागाने २०१८-१९ च्या रबी हंगामाच्या पेरणीसाठी २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे़; परंतु, जिल्ह्यात परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने आतापर्यंत केवळ ५६ हजार २४३ हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. या पेरणीची टक्केवारी केवळ २०.२८ टक्केच आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात पेरणी केलेली पिके पावसाअभावी शेतकऱ्यांच्या हातून गेली आहेत़ उसणवारी करून पिकांवर खर्च केला़ परंतु, उत्पादनातून तेवढे पैसेही शेतकºयांच्या हाती लागले नाहीत़ त्यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकºयांच्या आशा परतीच्या पावसावर होत्या; परंतु, नोव्हेंबर महिना संपत आला तरीही जिल्ह्यात परतीचा पाऊस झाला नाही़ परिणामी कृषी विभागाने २०१८-१९ च्या रबी हंगामासाठी २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे़ यामध्ये ज्वारी पिकासाठी १ लाख ११ हजार ९६०, गव्हासाठी ३७ हजार २९६, हरभºयासाठी १ लाख २३ हजार ३९०, करडईसाठी २ हजार ५४९ तर मक्यासाठी १८ हजार ३८ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे; परंतु, या वर्षीच्या पावसाळ्यात एकही समाधानकारक पाऊस झाला नाही़ त्यातच परतीच्या पावसानेही पाठ फिरविली आहे़ त्यामुळे विहीर, नदी, तलाव, ओढे यांना पाणीच आले नाही़ जिल्ह्यातील शेतकºयांसाठी वरदान ठरलेला निम्न दूधना प्रकल्प व येलदरी धरणातही समाधानकारक पाणीसाठा झाला नाही़ त्यामुळे या धरणातील पाणी शेतकºयांना रबी हंगामातील पिके जगविण्यासाठी उपलब्ध होणार नाही़ सध्या शेतकºयांनी खरिप हंगामातील पिकांची विल्हेवाट लावून रबी हंगामातील पेरणीसाठी शेतजमीन तयार केली आहे़; परंतु, २० आॅगस्टपासून जिल्ह्यात पाऊस झालेला नाही़ त्यामुळे ठिक ठिकाणी जमीन भेगाळली आहे़या जमिनीवर पेरणी करावी कशी? असा प्रश्न शेतकºयांसमोर उभा आहे़ काही शेतकºयांकडे सध्या पाणी उपलब्ध आहे; परंतु, हे पाणी रबी हंगामातील सिंचनासाठी पुरेल की नाही या भीतीने शेतकरी पेरणीसाठी धजावत नाहीत. त्यामुळे १४ नोव्हेंबरपर्यंत जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे २ लाख ७७ हजार २६७ हेक्टर क्षेत्र जमिनीपैकी केवळ २०.२८ टक्केच म्हणजेच ५६ हजार २४३ हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. यामध्ये ज्वारीची ३४ हजार ३९२, गव्हाचे २ हजार ६७२, तर हरभºयाच्या १८ हजार २३३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जमिनीत फारशी ओल नसल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत.पीक विमा योजनेची मुदत ३१ डिसेंबर४पाण्याअभावी १४ नोव्हेंबरपर्यंत केवळ ५६ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पेरणी केलेल्या शेतकºयांसाठी राज्य व केंद्र शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजना २०१८-१९ च्या रबी हंगामासाठी अंमलबजावणी सुरू केली आहे. १ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर दरम्यान या योजनेची मुदत आहे. यावर्षी राज्य शासनाने परभणी जिल्ह्याची विमा कंपनी बदलून आता भारती एक्सा या विमा कंपनीकडे जबाबदारी दिली आहे.४त्यामुळे पेरणी केलेल्या शेतकºयांंनी ३१ डिसेंबरपर्यंत आपल्या पिकाचा विमा उतरवून घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.४या योजनेत सहभागी होणाºया शेतकºयांना गव्हासाठी प्रती हेक्टरी ५१९ रुपयांचा विमा हप्ता भरावा लागणार आहे. त्याच बरोबर ज्वारीसाठी ३७८ रुपये, हरभºयासाठी ३४६.५० रुपये, करडईसाठी ३४६.५० रुपये तर उन्हाळी भूईमुगासाठी ५६७ रुपयांच्या हप्त्याची रक्कम शेतकºयांना भरावी लागणार आहे.जिल्ह्यासाठी दुष्काळात वरदान ठरलेल्या निम्न दुधना व जायकवाडी धरणातून परभणी जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील शेतकºयांसाठी रबी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी पाणीपाळ्या देण्यात येणार आहेत. त्यामुळे ३० नोव्हेंबरपर्यंत रबी हंगामातील गहू व हरभरा पिकाची पेरणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणीपाळ्या पूर्ण क्षमतेने देण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीagricultureशेती