शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

परभणी : नुकसान भरपाईसाठी हवेत ३१२ कोटी रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 00:26 IST

अतिवृष्टीने बाधित झालेल्या जिल्ह्यातील ४ लाख ६३ हजार ३७१ शेतकऱ्यांच्या ४ लाख ५६ हजार ६९८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची नुकसान भरपाई देण्यासाठी ३१२ कोटी ४४ लाख ४५ हजार रुपयांची आवश्यकता असून, तशी मागणी जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे नोंदविली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : अतिवृष्टीने बाधित झालेल्या जिल्ह्यातील ४ लाख ६३ हजार ३७१ शेतकऱ्यांच्या ४ लाख ५६ हजार ६९८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची नुकसान भरपाई देण्यासाठी ३१२ कोटी ४४ लाख ४५ हजार रुपयांची आवश्यकता असून, तशी मागणी जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे नोंदविली आहे.आॅक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाल्याने सोयाबिन, कापूस या प्रमुख पिकांसह खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्याचे काम हाती घेतले. तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सहायक आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत जिल्ह्यातील पिकांचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या अहवालानुसार ४ लाख ५६ हजार ९३३ हेक्टर क्षेत्रावरील जिरायती, बागायती आणि फळ पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. राज्य शासनाच्या दुष्काळ अनुदान वाटपाच्या निकषानुसार जिरायती पिकांना प्रति हेक्टरी ६ हजार ८०० रुपयांप्रमाणे अनुदान वितरित केले जाते. त्याचप्रमाणे बागायती पिकांना हेक्टरी १३ हजार ५०० आणि फळ पिकांना १८ हजार ५०० रुपये प्रति हेक्टरी नुकसान दिले जाते. या निकषानुसार जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे अनुदानाची मागणी केली आहे.या मागणीनुसार जिल्ह्यातील जिरायती पिकांच्या नुकसानीपोटी ३०९ कोटी १९ लाख ४९ हजार रुपये, नुकसानग्रस्त बागायती पिकांसाठी २ कोटी ३२ लाख १३ हजार रुपये आणि फळ पिकांच्या नुकसान भरपाईपोटी ९१ लाख ८३ हजार रुपयांची आवश्यकता भासणार आहे.या तिन्ही गटातील पिकांसाठी ३१२ कोटी ४४ लाख ४५ हजार रुपयांची आवश्यकता असून, तशी मागणी जिल्हा प्रशासनाने नोंदविली आहे. परभणी तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांसाठी ५५ कोटी ६४ लाख ३९ हजार रुपये, सेलू तालुक्यासाठी ३५ कोटी १ लाख २५ हजार रुपये, जिंतूर तालुक्यासाठी ४९ कोटी ९७ लाख ४७ हजार रुपये, पाथरी- २९ कोटी २८ लाख ४ हजार रुपये, मानवत २५ कोटी ५० लाख ९९ हजार रुपये, सोनपेठ १८ कोटी ९६ लाख २२ हजार रुपये, गंगाखेड ३३ कोटी ९९ लाख ५१ हजार रुपये, पालम २८ कोटी ७१ लाख २६ हजार रुपये आणि पूर्णा तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांसाठी ३५ कोटी ३४ लाख ९६ हजार रुपयांची मागणी नोंदविण्यात आली आहे.जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे तातडीने करुन विभागीय आयुक्तांकडे निधीची मागणी केली आहे. मात्र, अद्याप राज्य सरकारची स्थापना झाली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नोंदविलेली मागणी कधी पूर्ण होते? असा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र प्रत्यक्ष मदतीसाठी शेतकऱ्यांना आणखी काही दिवसांची प्रतिक्षाच करावी लागेल, असे दिसते.साडेचार लाख हेक्टरवरील : जिरायती पिके अतिवृष्टीमुळे झाली बाधित४यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात ५ लाख ५८ हजार ३० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. अतिवृष्टीमध्ये ४ लाख ५४ हजार ६९८ हेक्टर क्षेत्रावरील जिरायती पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.४त्याचप्रमाणे १७१९ हेक्टर क्षेत्रावरील बागायती पिकांचे आणि ५१५ हेक्टर क्षेत्रावरील फळ पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अहवाल प्रशासनाने तयार केला आहे.४परभणी तालुक्यामध्ये ८० हजार ५५०, सेलू ५१ हजार २१३, जिंतूर ७३ हजार ३९१, पाथरी ४२ हजार ९६३, मानवत ३७ हजार ४३८, सोनपेठ २७ हजार ८७७, गंगाखेड ४९ हजार ९७५, पालम ४२ हजार १९० आणि पूर्णा तालुक्यामध्ये ५१ हजार ३३२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे़४ही सर्व पिके राज्य शासनाच्या नुकसान भरपाईसाठी पात्र असल्याने राज्य शासनाने नुकसान भरपाईसाठी विभागीय आयुक्ताकडे निधीची मागणी केली आहे़जिरायती पिकांसाठी लागणारा अपेक्षित निधी४जिल्ह्यात जिरायती पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे़ त्यामुळे याच पिकांच्या नुकसान भरपाईसाठी सर्वाधिक निधी लागणार आहे़४जिल्हा प्रशासनाने जिरायती पिकांसाठी ३०९ कोटी १९ लाख ४९ हजार रुपयांची मागणी नोंदविली आहे़ त्यात परभणी तालुक्यात ५३ कोटी ८९ लाख ७५ हजार, सेलू तालुक्यात ३४ कोटी ७० लाख ९६ हजार, जिंतूर तालुक्यात ४९ कोटी ८५ लाख ८ हजार, पाथरी २९ कोटी १५ लाख २६ हजार, मानवत २५ कोटी ४२ लाख २६ हजार, सोनपेठ १८ कोटी ९५ लाख ३६ हजार, गंगाखेड ३३ कोटी ९७ लाख ८ हजार, पालम २८ कोटी ६७ लाख ३ हजार आणि पूर्णा तालुक्यासाठी ३४ कोटी ५६ लाख ७१ हजार रुपये केवळ जिरायती पिकांच्या नुकसान भरपाईसाठी लागणार आहेत़४या पिकांना प्रती हेक्टरी ६ हजार ८०० रुपये या प्रमाणे नुकसान भरपाईची ही रक्कम जिल्हा प्रशासनाकडून नोंदविण्यात आली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसFarmerशेतकरीfundsनिधी