शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

परभणी : गंगाखेड तालुक्यात पोलीस पाटलांची १७६ पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 00:57 IST

पोलीस आणि नागरिकांमधील दुवा म्हणून काम करणाऱ्या पोलीस पाटलांची जिल्ह्यात १७६ पदे रिक्त असून ही पदे भरण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून हालचाली सुरू झाल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी ) : पोलीस आणि नागरिकांमधील दुवा म्हणून काम करणाऱ्या पोलीस पाटलांची जिल्ह्यात १७६ पदे रिक्त असून ही पदे भरण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून हालचाली सुरू झाल्या आहेत.ग्रामीण भागामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची माहिती देण्याचे काम पोलीस पाटलांमार्फत केले जाते. पोलीस ठाण्यांतर्गत २० ते २५ गावांचा समावेश असतो. प्रत्येक गावापर्यंत पोलीस पोहोचू शकत नाहीत.एखाद्या गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर आशा वेळी पोलीस पाटील पोलीस प्रशासनाच्या मदतीला येतात. गावातील माहिती पोलीस पाटलामार्फत पोलिसांपर्यंत पोहचविली जाते. अनेक प्रकरणांमध्ये तपासासाठी लागणारी छोटी-मोठी माहितीही पोलीस पाटील उपलब्ध करून देतात. गावामध्ये पोलीस प्रशासनाविषयी सकारात्मक दृष्टकोन निर्माण करण्याचे कामही पोलीस पाटलांमार्फत होत असते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस पाटील हा महत्त्वाचा घटक आहे. जिल्ह्यात पोलीस पाटलांची एकूण ८१३ पदे मंजूर आहेत. त्यापैकी १७६ पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत हालचाली सुरु झाल्या आहेत.गंगाखेड उपविभागात सर्वाधिक रिक्त पदेजिल्ह्यात चार उपविभाग असून गंगाखेड उपविभागात रिक्त पदांची संख्या अधिक आहे. या उपविभागामध्ये पोलीस पाटलांची २६६ पदे मंजूर असून त्यापैकी ६५ पदे रिक्त आहेत. परभणी उपविभागामध्ये १२९ पदांपैकी २० पदे रिक्त आहेत. पाथरी उपविभागात १६६ पैकी ४५ आणि सेलू उपविभागात २५२ पैकी ४६ पदे रिक्त आहेत. त्यामुळे या गावांमधील गुन्हे विषयक घटनासंदर्भात माहिती घेताना पोलीस कर्मचाºयांची धावपळ होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRural Developmentग्रामीण विकासRevenue Departmentमहसूल विभाग